आपण नेहमी आनंदी कसे राहावे?

आपण नेहमी आनंदी कसे राहावे? - आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवे? या आनंदी विषयावर चर्चा करणारा योगेश सोनवणे यांचा लेख.
आपण नेहमी आनंदी कसे राहावे?
आपण नेहमी आनंदी कसे राहावे? (मराठी लेख), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

आनंदी कसे राहावे?

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात नेहमी अशा काही गोष्टी घडत असतात. ज्यामुळे आपल्याला त्रास मनस्तापाला सामोरे जावे लागत असते किंवा आपण अजिबात दुःखी व्हायचे नाही असे मनापासुन आपण ठरवले तरी आपल्या आयुष्यात अशा काही घटना, प्रसंग घडतात ज्यामुळे आपण दुःखी होत असतो.

अशा वेळी आपल्याला हा प्रश्न पडतो की प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा दुःखी न होता आपण नेहमी आनंदी कसे राहावे? माझ्याही आयुष्यात असेच काही प्रसंग उद्‌भवले ज्यातुन मी खुप काही शिकत गेलो अणि त्याच शिकलेल्या गोष्टींना मी आज आपणा सगळ्यांसोबत सामायिक करण्याचे ठरवले आहे जेणेकरुन मी ज्या चुका माझ्या आयुष्यात केल्या त्या आपण करणार नाही.

तर, अशाच तुम्हाला मला पडणाऱ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तसेच आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवे? हे सुद्धा आपण आपल्या ह्या लेखातुन समजुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण नेहमी आनंदी कसे राहायचे?

आनंद हा आपल्या मानवी जीवनाचा सर्वात मोठा घटक आहे.आज आपण जे काही करतो आहे ते आपण आपल्या आनंदासाठीच करत असतो अणि आज हाच आनंद आज आपल्या जीवनातुन कमी होत चालला आहे. रोजच्या कामाच्या व्यापामुळे, मानसिक तणावामुळे, अपेक्षाभंगामुळे अशा अनेक कारणामुळे आज आपल्या जीवनातला आनंद हा हिरावत चालला आहे. म्हणुन आज आपण नेहमी आनंदी कसे राहावे?हे जाणुन घेणे फार गरजेचे झालेले आहे.


आपण नेहमी आनंदी का राहावे?

मित्रांनो आपल्या जीवनात अडी - अडचणी, चांगले वाईट प्रसंग तसेच दिवस हे येतच असतात. याचेच नाव तर आयुष्य असते. मग जे निश्चितच असते ते कधी बदलणारच नसते. ते चिरंतन चालणारे असते. त्याचे आपण दुःख का करत बसायचे?

म्हणजेच जसे आपल्या आयुष्यात सुख येणार आहे तसे कधीतरी दुःखही येणार हे अटळ असते. मग जे अटळ आहे त्याची भीती तसेच तमा कशाला बाळगायची. उलट त्याला आनंदाने सामोरे जायचे. जसे आपण सुखाचा उपभोग घेतो आनंद लुटतो तसाच आपण दुःखाचाही आनंद लुटणे शिकायला हवे. कारण सुख अणि दुःख हे दोघेही आपल्या जीवनाचे दोन महत्वाचे पैलु आहेत.

म्हणुन आपण सुख उपभोगायचे अणि दुःखापासुन दुर पळायचे असे अजिबात करु नये. उलट आपण आयुष्यात येणार्‍या वाईट प्रसंगालाही तसेच दुःखालाही आनंदाने सामोरे जायला हवे. म्हणजेच सुखात अणि दुःखात दोन्ही क्षणांत आपण आनंदी राहायला हवे. तसेच शिकायला हवे. याच्याने आपले आयुष्य खुप सोप्पे होऊन जाईल अणि दुःखाची चिंता संकटांची भीती ही आपल्या मनात अजिबात वास करणार नाही.

म्हणुन आपण सुखात अणि दुःखातही नेहमी आंनदी राहायला हवे. का तर आपल्याला जे आयुष्य परमेश्वराने दिले आहे ते भरभरुन जगण्यासाठी त्याचा आनंद लुटण्यासाठी. कारण मित्रांनो एकदा जर आयुष्य संपले ना तर ते पुन्हा आपल्याला वापस मिळणार नाही. जे आयुष्य आपल्याला एकदाच मिळाले आहे. ते आपण रडण्यात, कुढण्यात तसेच दुःखी होत बसत वाया का घालवायचे? म्हणुन आपण नेहमी आयुष्यात आनंदाने राहायला तसेच जगायला हवे.


आपण केव्हा अणि कधी आनंदी राहायला हवे?

खरे पाहायला गेले तर आपण केव्हा अणि कधी आनंदी राहायला हवे हा प्रश्नच करणेच चुकीचे आहे. कारण जोपर्यत आपले आयुष्य आहे तोपर्यत आपण नेहमी आनंदाने ते आयुष्य जगायला हवे. मग तो क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा असो. कारण सुख अणि दुःख चांगले - वाईट दिवस हे आपल्या आयुष्यात नेहमी येणारच असतात. म्हणुन आपण चांगल्या अणि वाईट या दोन्ही क्षणांत नेहमी आनंदी राहायला हवे अणि हेच खर आयुष्य जगणे आहे.


आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करावे?

मित्रांनो आपल्याला जर जीवनात नेहमी आनंदी राहायचे असेल तर काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपण लक्षात घेणे अणि त्यांचे पालन करणे फार गरजेचे आहे अणि ह्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण नेहमी आनंदी कसे राहावे हा प्रश्नच आपल्याला कधी पडणार नाही अणि त्या महत्वाच्या बाबी ह्या पुढीलप्रमाणे आहेत...

आपण जुने सर्व काही विसरुन जाणे शिकायला हवे

आत्तापर्यत आपल्या आयुष्यात भुतकाळात काय घडले? आत्तापर्यत कोण आपल्यासोबत काय अणि कसे वागले? हे सर्व काही आपण विसरुन जायला हवे. कारण जुन्या वाईट गोष्टी घटना, प्रसंग आठवुन आपल्याला फक्त अणि फक्त त्रासच होत असतो. फायदा काहीच होत नसतो.

ती व्यक्ती मला असे - तसे बोलली, ती व्यक्ती माझ्यासोबत अशी - तशी वागली हा विचार सतत करुन आपण आपलीच मनाची शांती गमावुन बसत असतो अणि ज्या व्यक्तीमुळे आपण स्वतःला त्रास करुन घेत असतो स्वतःचे मानसिक संतुलन आपण बिघडवुन घेत असतो. आपण एवढे काही करत असतो पण त्या व्यक्तीला मुळात आपल्याशी काही देणं - घेणं नसते. तो त्याच्या आयुष्यात एकदम आनंदात अणि मजेत जगत असतो अणि ह्याच एका गोष्टीचा सर्वात जास्त त्रास आपण स्वतःला करुन घेत असतो.

गेले त्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा येणार त्याचे हसतमुखाने स्वागत करायला आपण शिकायला हवे अणि जे व्यक्ती आपल्याला विसरले आपणही त्यांना विसरुन जायला हवे.

अश्या व्यक्तिंना बळजबरी कवटाळण्याचा आपण जरी कितीही प्रयत्न केला तरी ती व्यक्ती आपल्याला टाळण्याचाच प्रयत्न करणार हे निश्चित असते. कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली काहीच किंमत राहिलेली नसते. तो व्यक्ती आपल्याला विसरलेला असतो.

मग अशात आपण बळजबरी त्याच्या मागे कितीही जायचा प्रयत्न केला तरी आपल्या पदरी निराशाच पडणार असते. म्हणुन ज्या व्यक्तीला आपली अजिबात गरज नाही, त्याला अजिबात आपल्या प्रेमाची किंमत नाही अशा व्यक्तीमागे आपण आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा व्यक्तींना वेळ द्यायला हवा ज्यांना खरच मनापासुन आपली कदर असते, आपली गरज असते.

तसेच ज्या व्यक्तीला आपली किंमत नाही तिच्यामागे आपला वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा स्वत:चे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण आपला वेळ व्यतित करायला हवा.

आपण स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी. स्वतःच्या प्रगतीसाठी विकासासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते सर्व काही आपण करायला हवे. कारण कोणाचेच आयुष्य कोणाविना थांबत नसते. मग आपण तरी कशाला कोणा एका व्यक्तीसाठी आपल्याला मिळालेले एवढे अनमोल जीवन वाया घालवायचे किंवा ते संपवुन घ्यायचे.

म्हणुन आपण आपल्या सोबत घडलेले जुने सर्व काही वाईट घटना, प्रसंग विसरायला शिकायला हवे अणि नव्याचा आनंदाने स्वीकार करायला हवा अणि स्वतःवर काम करायला हवे. विनाकारण इतरांमागे आपण आपले आयुष्य वाया घालवत बसु नये.


आपण इतरांमध्ये आपला आनंद शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आपला आनंद शोधायला हवा.

आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे कारण हे सुद्धा आहे की आपण आपला आनंद स्वतःमध्ये न शोधता इतरांमध्ये तो शोधत असतो, तसेच बघत असतो याच कारणामुळे एखादी अशी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष ज्याला, जिला आपण आपले सर्वस्व मानलेले असते ती आपल्यापासुन दुर झाल्यावर आपल्याला जगणे अवघड होऊन जाते.

याला कारण एकच आपण आपला आनंद त्या व्यक्तीमध्ये बघत असतो. आपण आपले सर्व आनंदाचे मुळ त्या एका व्यक्तीलाच मानलेले असते. म्हणुन ती एक व्यक्ती आपल्यापासुन दुर गेल्यावर आपण निराश होतो. आपले आयुष्य आपल्याला भकास वाटायला लागते.

आपल्याला असेही वाटायला लागते की आपल्याला आयुष्यात आता ती व्यक्ती सोडुन गेल्यामुळे काहीच उरलेले नाहीये. अणि हे असे का होते तर आपण कोणावर तरी जास्तच अवलंबुन राहायला शिकुन जातो. कोणाला तरी आपले सर्वस्व मानुन बसतो.

कोणीतरी एखादी अशी व्यक्ती असते जिला आपण आपल्या जीवनातील सर्व आनंदाचे, चैतन्याचे कारण मानुन बसतो अणि मग तीच व्यक्ती आपल्याला सोडुन गेल्यावर आपल्याला असे वाटायला लागते की आता आयुष्यात आनंदाचे काही कारणच उरले नाहीये.

ज्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात आनंद होता आता ती व्यक्तीच आपल्याला सोडुन निघुन गेली आहे अणि तिच्या सोबत आपल्या जीवनातील आनंदही निघुन गेला आहे अणि असे का होते तर आपण आपला आनंद इतरांमध्ये बघत असतो तसेच तो शोधत असतो.

म्हणुन आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आपण आपला आनंद आपल्या स्वतःमध्येच शोधायला हवा, तो इतरांमध्ये शोधत फिरू नये अणि तसे आपण केले तर निराशेशिवाय आपल्या पदरी दुसरे काहीच पडणार नाही.

कारण आपल्या जीवनात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला कधी ना कधी सोडुन जाणारच असते अणि त्यातच आपण त्या एका व्यक्तीमध्येच आपला आनंद शोधत बसलो, तसेच बघत बसलो तर उद्या तीच व्यक्ती आपल्याला सोडुन गेल्यावर आपले काय होणार? याचा देखील आपण विचार करायला हवा.

म्हणुन कधीही आपण कोणावरच इतकेही अवलंबुन राहु नये की उद्या त्या व्यक्तीने आपल्याला सोडुन दिल्यावर आपल्याला अजिबात जगताच येणार नाही. म्हणुन इतरांमध्ये आपण आपला आनंद शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आपला आनंद शोधायला हवा.


आपण नेहमी भावनिक संतुलन राखणे शिकायला हवे

आपण नेहमी कोणत्याही व्यक्तीशी नाते जोडताना भावनिक संतुलन राखणे फार गरजेचे आहे. कारण भावनिक संतुलन न राखल्यामुळे आपल्याला त्या नात्याची, त्या व्यक्तींची इतकी भयंकर लत लागुन जाते की त्या व्यक्तीने एकही दिवस आपल्याशी बोलला नाही तर आपण हताश तसेच निराश होऊन बसत असतो.

त्या व्यक्तीने आपला, आपल्या भावभावनांचा विचार करावा असे आपल्याला मनापासुन वाटत असते का तर आपण त्या व्यक्तीशी भावनिकदृष्टया जोडले गेलेलो असतो तसेच त्या व्यक्तीमध्ये आपण भावनिक दृष्टया पुर्णपणे गुंतलेलो असतो.

पण समोरच्या व्यक्तीचे तसे काहीच नसते. तो आपल्याशी फक्त एक सामान्य नाते जपत असतो जे आपण अपरिचित लोकांशी ठेवत असतो. कुठेतरी भेटला का दोन शब्द बोलुन घ्यायचे मग तो त्याच्या रस्त्याला आपण आपल्या रस्त्याला असे नाते तो व्यक्ती आपल्याशी ठेवत असतो.

म्हणजेच त्याने आपले भावनिक संतुलन पुर्णपणे राखलेले असते. पण तसे आपल्या बाबतीत नसते आपल्याला भावनिक संतुलन न राखता आल्यामुळे आपल्या त्या व्यक्तीपासुनच्या अपेक्षा वाढत जातात अणि उद्या पुढे जाऊन त्या पुर्ण न झाल्यावर आपण दुःखी होत असतो अणि मग म्हणत असतो की लोकांनी माझा कामापुरता वापर करुन घेतला अणि आता ते मला पुर्णपणे विसरले आहेत.पण तसे काही मुळात नसतेच त्यांनी भावनिक संतुलन राखुन आपल्याशी नाते जोडलेले असते म्हणुन नंतर पुढे जाऊन आपण त्यांच्यापासुन दुर गेलो तरी त्यांना काहीच एवढा फरक पडत नसतो.

पण आपल्याला तो फरक पडत असतो का तर आपण आपले भावनिक संतुलन राखलेले नसते. म्हणुन आपण नेहमी कोणतेही नाते जोडताना, निभावताना एक भावनिक संतुलन राखणे शिकायला हवे.

कोणावर इतकेही आपण भावनिकदृष्ट्या अवलंबुन राहु नये की ती व्यक्ती आपल्यापासुन उद्या दुर गेल्यावर आपण तिच्याशिवाय राहु शकणार नाही. तिच्याविना आपले जगणे अवघड होऊन जाईल.

एवढेही आपण भावनेमध्ये वाहुन जाऊ नये की ती व्यक्ती आपल्यापासुन दुर गेल्यावर तिच्याविना आपल्याला श्वास घेणेसुदधा कठीण होऊन जाईल. इतकेही भावनिकदृष्टया कोणाशी बांधले जाऊ नये की ती व्यक्ती आपल्यापासुन दुर झाल्यावर आपल्या जीवनातील आनंदच निघुन जाईल तसेच तो हिरावला जाईल.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण कोणाशीही कोणतेही नाते जोडताना नेहमी आपले भावनिक संतुलन राखायला हवे.


आपण स्वतःला नेहमी आपल्या आवडीच्या कामात सतत व्यस्त ठेवायला हवे

मित्रांनो, माणुस हा सर्वात जास्त आनंदी तेव्हाच असतो जेव्हा तो त्याच्या आवडीचे काम करत असतो. कारण त्याक्षणी खर्‍या अर्थाने तो स्वतःला सापडलेला असतो. स्वतःशी संवाद साधत असतो.

म्हणुन नेहमी आपण आपला पुर्णवेळ त्याच कामात घालवत जायला हवा जे काम करताना आपल्याला आपल्या आजुबाजुच्या सर्व गोष्टींचा विसर पडत असतो.

कारण तेच आपले खरे पँशन असते जे करताना आपल्याला आपल्या तहान - भुक, झोप तसेच वेळेचाही विसर पडतो. कारण जे काम करताना सकाळ कधी होते अणि रात्र कधी संपते आपल्याला याचेही भान राहत नाही.

म्हणुन आपण नेहमी स्वतःला पुर्णवेळ अशा कामात व्यस्त ठेवायला हवे जे काम करताना आपल्याला सर्व जगाचा विसर पडतो. एवढे आपण त्या कामात दंग असतो.


कधीच कोणाकडुनही कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही

मित्रांनो ह्या जगातील सर्व दुःखाचे कारण एकच आहे अपेक्षा. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा? लोकांनी आपल्याला समजुन घ्यावे, लोकांनी आपली कदर करावी, लोकांनी आपला आदर करावा.तसेच जीवनात कोणीतरी आपल्याला समजुन घ्यावे ही अपेक्षा.

तसेच कोणीतरी आपल्या मनाप्रमाणेच वागावे आपल्याला जीव लावावा अशी अपेक्षा.अशा खुप अपेक्षा असतात ज्यांना चिकटुन आपण आज जगत असतो अणि ह्याच अपेक्षा नंतर पुर्ण नाही झाल्या का आपण दुःखी होत असतो. म्हणुन मित्रांनो कोणाकडुन कोणतीच अपेक्षा न ठेवणे हा नेहमी आनंदी राहण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख सहन करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. म्हणुन आपल्याला नेहमी आनंदी राहायचे असेल तर आपण जीवनात कधीच कोणाकडुनही कोणतीही अपेक्षा न बाळगता जगायला हवे.


आपण नेहमी व्यायाम आणि ध्यान केल्याने आपण नेहमी निरोगी राहतो अणि आपली एकाग्रताही वाढते

मित्रांनो वरील सर्व उपायांबरोबर अजुन एक उपाय आहे जो केल्याने आपण नेहमी आनंदी तसेच तणावमुक्त राहू शकतो. तो उपाय म्हणजे रोज व्यायाम करणे, ध्यान करणे. मित्रांनो नियमित व्यायाम केल्याने आपण नेहमी निरोगी राहत असतो.

तसेच आपले आरोग्यही नेहमी चांगले राहत असते. आपण आजारांपासुन मुक्त राहत असतो. त्याचबरोबर ध्यान केल्याने आपली एकाग्रता वाढते.

ध्यान केल्याने आपण कोणतेही काम करताना ते पुर्ण एकाग्रतेने करु शकतो जसे की वाचन. तसेच आपण ध्यान केल्याने तणावमुक्तही राहतो. दिवसभर आपल्या मनात जी विचारांची वर्दळ चाललेली असते ध्यान केल्याने ती थांबत असते अणि आपण एकाग्र होऊन कोणतेही काम करु शकत असतो. नेहमी व्यायाम केल्याने, ध्यान केल्याने आपला मुडही नेहमी फ्रेश राहत असतो. म्हणुन नेहमी व्यायाम करणे तसेच ध्यान करणे आपणास निरोगी ठेवते.


आपण आपला राग गिळायला शिकायला हवे

आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे मुळ म्हणजे राग. कारण राग आल्यावर आपल्याला कसलेच भान राहत नसते.आपण आपली विचार करण्याची क्षमताच गमावुन बसलेलो असतो अणि मग रागाच्या भरात आपण असे काही तरी पाऊल उचलुन बसतो तसेच इतरांना असे काहीतरी बोलुन बसतो की नंतर आपल्याला त्याबाबत पश्चाताप करण्याची वेळ येत असते.

पण तेव्हा पश्चाताप करुन काहीच फायदा होत नसतो कारण समोरच्याच्या मनात आपली असलेली किंमत उतरुन गेलेली असते. भलेही मग नंतर तो आपल्याला माफ करतो पण पहिलेसारखी किंमत आपली त्याच्या नजरेत राहत नसते. तो आपल्याशी अंतर बाळगुनच राहत असतो.

कारण ते म्हणतात ना पहिला प्रभाव हाच शेवटचा प्रभाव असतो. म्हणुन आपण नेहमी आपल्या रागावर संयम तसेच नियंत्रण ठेवायला हवे.अणि जास्तीत जास्त करुन आपण रागात असताना कोणालाही भेटणे टाळावे, कोणाशीही संवाद करणे टाळावे. खरेतर रागात असताना आपण एकांतातच वेळ घालवावा कारण होते काय की आपण रागात असताना कोणाशी बोललो किंवा कोणाशी संवाद जरी साधला तर आपला राग आपण त्या व्यक्तीवरच काढुन मोकळे होत असतो अणि त्याची त्यात काही चुकही नसते तरीही. याच्याने समोरच्याचे मन दुःखावते तसेच आपले संबंधही त्याच्याशी बिघडतात अणि हे सर्व का होते तर काही क्षणांसाठी आलेल्या एका रागामुळे. म्हणुन आपण नेहमी आपला राग गिळायला शिकायला हवे. त्याच्यावर नियंत्रण ठेवायला हवे.


आपण इतरांशी आपली तुलना कधीच करू नये

आपल्या आयुष्यातील दुःखाचे अजुन एक महत्वाचे कारण म्हणजे तुलना. आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात इतरांशी स्वतःची तुलना करत असतो.की त्याच्याकडे असे आहे?त्याच्याकडे तसे आहे?तो इतका हुशार आहे मी किती मठठ आहे?त्याला हे जमत पण मला ते अजिबात जमत नाही तो महिन्याला इतका पैसा कमावतो त्याच्याकडे गाडी बंगला आहे पण माझ्याकडे काहीच नाही.मी महिन्याला दहा बारा हजारच कमावतो.

अशी आपण नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करीत असतो.अणि यामुळे होते काय की आपण इतरांशी स्वतःची स्पर्धा करायला लागतो.

मी त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमावुन दाखवेल ह्या जिद्दीत पैसा कमावण्यासाठी आपण इतकी दिवसरात्र मेहनत घेत बसतो की आपल्याला आपल्या कुटुंबियांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही.

तसेच स्वतःच्या आनंदासाठीही आपण वेळ काढत नसतो. इतरांना हरवण्यासाठी आपण इतके जिद्दीने पेटुन उठलेलो असतो की आपले स्वतःचे सुदधा एक आयुष्य आहे जे आपल्याला जगायचे आहे हे आपण विसरुनच जात असतो. मग होते काय की वृदधाल्पकाळापर्यत आपण खुप मेहनत घेतो अणि त्यातुन खुप पैसाही कमावत असतो.

पण नंतर आपल्याला जाणीव होते की स्पर्धेत धावता धावता इतरांना हरवण्याच्या नादात तसेच अवाढव्य पैसा कमविण्याच्या मोहात आपण आपल्याला मिळालेले अनमोल आयुष्यच जगायचे विसरुन गेलो आहे. पण तेव्हा जाग येऊनही काहीच फायदा नसतो. कारण तेव्हा वेळ हातातुन निघुन गेलेली असते.आयुष्य संपलेले असते.

म्हणुन आपण कधीच कोणाशी स्वतःची तुलना करत बसु नये. आहे त्यात आपण सुख मानावे अणि आयुष्य आनंदाने जगायला हवे. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असे नसते कोणाकडे अवाढव्य पैसा असतो गाडी बंगला असतो पण मनाची शांती नसते सुख नसते.

तर कोणाकडे अवाढव्य पैसा नसतो पण मनाची शांती असते सुख असते.असे आयुष्याचे गणित आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही असते त्याला सर्व काही मिळालेले असते असे नसतेच कुठेतरी काहीतरी कमी ही राहुनच जाते. म्हणुन आपण कधीच इतरांशी आपली तुलना करत बसु नये.


छोटछोटया गोष्टींमध्ये आपल्याला आपला आनंद शोधता यायला हवा

मित्रांनो आनंद हा कशात असतो? अणि तो कसा मिळवायचा? हे जर आपल्याला एकदा जर कळले ना तर आपण आयुष्यात कधीच दुःखी राहणार नाही.अणि आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येणारही नाही.

जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आपला आनंद दडलेला असतो. फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. छोटछोटया गोष्टींमध्ये सुदधा एक आनंद दडलेला असतो.

जसे की आपण रोज टिव्ही बघतो एखादी मालिका आपल्याला खुप आवडते त्या मालिकेतील घडणारे घटना प्रसंग आपल्याला आपलेसे वाटत असतात.

आपण त्यामुळे ती मालिका बघण्यात इतके रंगुन जातो की आपण जेवता जेवता थांबून जातो अणि त्या मालिकेत हरवुन जातो हे असे का होते तर आपण त्या मालिकेत आपला आनंद शोधत असतो.

जसे की जेव्हा आपण झी युवावरची मालिका फुलपाखरु बघतो तेव्हा मानस अणि वैदहीचे प्रेम बघुन आपल्यालाही असे वाटायला लागते की आपली प्रेमकथा पण अशीच असायला हवी तसेच आपली प्रेयसीसुदधा अशीच वैदहीसारखी क्युट असावी किंवा आपल्याला ती मालिका बघताना असाही भास व्हायला लागतो की त्या मालिकेतील माणस हा मी आहे अणि वैदही नावाचे पात्र जे आहे ती माझी काँलेजमधील वर्गातील प्रेयसीच आहे अणि आपण मग ते दोघांमधील प्रत्येक प्रेमाचे क्षण आपले म्हणुन जगत असतो मानस अणि वैदहीच्या प्रेमाच्या कथेत आपण आपली कथा बघण्याचा तसेच ती रंगवण्याचा प्रयत्न करत असतो.

अशा खुप छोटछोटया गोष्टी आपल्या जीवनात असतात मित्रांनो ज्यात आपण आपला आनंद शोधत असतो.तसेच तो आपण शोधायला हवा अणि आपल्याला तो शोधता यायला हवा जेणेकरुन आपण दुःखी होत बसणार नाही.याच्याने आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रेमाची पोकळ इतरांना प्रेमात अणि सुखात रंगलेले पाहुन भरुन काढता येत असते.

अशा प्रकारे आपल्याला छोटछोटया गोष्टींमध्ये आपला आनंद शोधता तसेच बघता यायला हवा.


शेवटचा सल्ला

अशा पदधतीने आज आपण नेहमी आनंदी कसे राहावे? तसेच आपण नेहमी आनंदी का राहावे? तसेच केव्हा अणि कधी आनंदी राहावे? हे आजच्या लेखातुन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तरी आशा बाळगतो मित्रांनो आपल्याला हा लेख नक्की आवडेल अणि हा लेख आपणास आवडल्यास फक्त आपल्यापर्यत सीमीत ठेवु नका आपल्या जास्तीत जास्त गरजु मित्र मैत्रीणींपर्यत, हा लेख पोहचवा जेणेकरून त्यांनाही या लेखाचा लाभ घेता येईल.

- योगेश सोनवणे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.