Loading ...
/* Dont copy */

कलाकाराचे सामाजिक योगदान (मराठी लेख)

कलाकाराचे सामाजिक योगदान (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक अमोल तांबे यांचा कलाकाराचे सामाजिक योगदान हा मराठी लेख.

कलाकाराचे सामाजिक योगदान (मराठी लेख)

कलाकार एक सामाजिक परिवर्तनातील मुख्य सहभागी...


कलाकाराचे सामाजिक योगदान

जर कलाकाराला मानवी मूल्यांचा विसर पडला किंवा तो भित्रा झाला तर समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.



कला म्हणजे विवेक, चिंतन, सृजनशीलता, ज्ञान, कल्पना यांच्या एकत्रितेतून सादर करता येणारी क्रिया” असे म्हणता येईल. त्यामुळे कला ही मानवी क्रियाकलापाची प्रमुख व आदर्श अशी अभिव्यक्ती मानली जाते. कलेच्या माध्यमातून मानवी भावनांची व विचारांची अभिव्यक्ती सातत्याने होत असते. कला आणि समाज या दोहोंना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कलाकार होय. कलाकाराशिवाय कोणतेही कला समाजापर्यंत पोहचू शकत नाही.

कलाकार स्वतःच्या मनातील कोलाहल बाजूला सारून अविरतपणे साकार करत असतो. एक सुंदर कलाकृती आणि समाजाला मनोरंजन, आनंद, उत्साह, ज्ञान, प्रेरणा, बोध, संवेदना आणि विचार यांच्या खोलात घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. कलाकार हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते त्याचबरोबर कलाकार हा समाजाचा आवाज ही मानला जातो, त्यामुळे कलाकार हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे.

आपल्या कलेच्या माध्यमातून कलाकार आपले विचार आणि भावना प्रकट करतो. तसेच विविध मानवी अनुभव आपल्या कलेतून व्यक्त करत असतो. कलाकार हा अभिनय, वादन, नृत्य, संगीत, वक्तत्व कथाकथन, लेखन, शिल्पकला, स्थापत्यकला यांसारख्या विविध कलांमार्फत समाजासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत असतो. कलाकार आपल्या कलेतून मानवी आणि सांस्कृतिक समृद्धता प्रस्तापित करतो.

सामाजिक भूमिका


समाजातील कलाकाराची सामाजिक भूमिका जास्त महत्त्वाची ठरते, कारण ती समाजाला संघटित आणि सक्षम बनवते. सामाजिक बांधिलकीतून कलाकार मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाचे कार्य करत असतो. कलाकार समाजाला आपल्या कलेतून उच्चतम अनुभूती देऊन समाजाला जागृत करण्याचे कार्य करत असतो. कला आणि समाज यांची सांगड घालताना कलाकार आपला अनुभव तसेच समाजाच्या वास्तविक परिस्थितीचा आढावा घेऊन सुजनशीलतेचा उत्तम नमुना तयार करतो व समाजाला आपल्या कलाकृतीशी अखंडपने जोडून ठेवतो.

समाज, कलाकरांनी निर्माण केलेल्या कलेचा आस्वाद घेऊन विचार आणि संवेदनशीलतेशी सुसंवाद साधु लागतो. जात-धर्म-पंथ याच्या पलीकडे जाऊन कलाकार एकतेचे मूल्य अंगी जोपासून त्याची समाजात रुजवणूक करतो. आपल्या कलेतून समाजातील महत्त्वाचे प्रश्न, समस्या सातत्याने मांडतो. त्यामुळे त्याच्या कलाकृतीचा समाजावर सखोल आणि सकारात्मक परिणाम होत असतो. कलाकार आपल्या कलाकृतीतून नेहमी समाजाचे वास्तविक प्रतिबिंब दाखवतो. म्हणून कलाकार हा परिवर्तनचा प्रमुख घटक मानला जातो.

इतिहासाची ओळख


प्राचीन काळापासून, कलाकारांनी विविध कलांचा उपयोग करून इतिहासाची ओळख करून दिली आहे. आज एकवीसव्या शतकात इतिहासातील विविध कलाकृतिमधून इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाचा व त्या कालखंडतील संस्कृतीचा अभ्यास करता येतो.

प्राचीन काळात शिल्पकलेच्या माध्यमातून कलाकारांनी मोठ्या प्रमाणात प्राचीन घटनांच्या अवधारणांचे विविध प्रकारांत चित्रण केले आहे. संस्कृतीच्या विविध आयामांना अभिव्यक्त करून सांस्कृतिक विरासत वाढवली आणि आपल्या भविष्यातील पिढीला सांस्कृतिक समृद्धता प्रदान केली आहे. कलाकार हा संस्कृतीचे व इतिहासाचे संवर्धन करून त्याचे वहन करण्याचे महत्वाचे कार्य करतो हे यावरून लक्षात येते.

सद्याची सामाजिक स्थिती पाहता समाजात राजकीय, सांस्कृतिक, भाषिक, शैक्षणिक, सामाजिक अस्थिरता निर्माण झालेली दिसून येते. अशावेळी समाजातील, व्यक्तीस्वातंत्र्य, एकता, समता, संस्कृती लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. कलाकाराने अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत तसेच निर्भीडपणा तसेच स्वतःमधील मानवी मूल्यांची जोपासना करत स्वतःमध्ये कायम टिकवून ठेवणे गरजेचे आहेत.

जर कलाकाराला मानवी मूल्यांचा विसर पडला किंवा तो भित्रा झाला तर समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सामाजिक समता, एकता, संस्कृती टिकवण्यासाठी कलाकारांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. सामाजिक सखोला टिकवून ठेवण्यासाठी कलाकार अतिशय महत्वाचा घटक आहे.

कलाकाराचे सामाजिक योगदान


समाज आणि कलाकार हे नाते अतिशय दृढ आहे. कलाकार स्वतःचे दुःख बाजूला सारून तो समाजासाठी स्वत:ची कला व जीवन अर्पण करून मानवी जीवन आणि संस्कृती, समृद्ध करत असतो. कलाकाराला फक्त समाजाकडून प्रोत्साहित करणारी दाद आणि प्रेमाची साथ आवश्यक असते.



कलाकाराचे सामाजिक योगदान (मराठी लेख) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- अमोल तांबे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची