Loading ...

पेरणीचे दिवस आले (मराठी कविता)

पेरणीचे दिवस आले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुधाकर राठोड यांची पेरणीचे दिवस आले ही मराठी कविता.

पेरणीचे दिवस आले (मराठी कविता)

पेरणीचे दिवस आले, पेरणी चालू करा...


पेरणीचे दिवस आले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘सुधाकर राठोड’ यांची ‘पेरणीचे दिवस आले’ ही मराठी कविता.



पेरणीचे दिवस आले
पेरणी चालू करा
कृषिकेंद्र दाखवेल आमिष
दुरुनच रामराम करा

शेतकऱ्यांनी बियाणे घ्यावे
निरखुन पारखुन
भावा मध्ये तफावत असले
तर पटकन जावे सरकून

बाजारामध्ये भेसळ युक्त
बी बियाणे आहे
घ्यावे तेच ज्यावर
ट्रेडमार्क आहे

काही तृटी असल्यास
कृषि अधिकारीला भेटावे
असेल काही शंका तर
तात्काळ अ‍ॅक्शन घ्यावे

आपल्या सतर्कतेने इतर शेतकरीचे
फसवणूक होणार नाही
चांगल्या बियाण्यापासून
शेतकरी मुकणार नाही

बी असेल दमदार तर
पिक येईल जोमदार
निसर्गाने दिली साथ तर
शेतकरी बनेल खजिनदार

कृषिकेंद्र मध्ये बियाणे असते
ना ना विविध प्रकारचे
दिशाहीन असेल शेतकरी
तर लक्ष वेधावे सरकारचे

या वर्षी शेतकरी बनेल
मालक असे मनाला वाटते
स्वप्न बगत बगत शेतकरी
आप आपल्या शेतात राबते

करा पेरणी सुरु
नवीन आशा ठेऊनी
येईल पिक आपल्या दारी
बी बियाण्याच्या रूपानी


पेरणीचे दिवस आले (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- सुधाकर राठोड

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची