मकरसंक्रांत म्हणजे - सण माधुर्याचा सण स्नेहगुणाचा - विविध धर्म, जात आणि पंथाने नटलेल्या या भारतातील एक मुख्य सण म्हणजे मकरसंक्रांत.

विविध धर्म, जात आणि पंथाने नटलेल्या या भारतातील एक मुख्य सण म्हणजे मकरसंक्रांत
मकरसंक्रांत म्हणजे
मकरसंक्रांत म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण. वर्षभरात बारा राशीतून जरी सूर्याची संक्रमणे होत असली तरी भारतवासियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला अधिक महत्व आहे
विविध धर्म, जात आणि पंथाने नटलेल्या या भारतातील एक मुख्य सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत हा पौष महिन्यात येणारा महत्वाचा सण आहे. मकरसंक्रांत या सणास दक्षिण भारतात पोंगल या नावाने ओळखले जाते. पौष महिन्यात सूर्य ज्या तिथीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायणाचा प्रारंभ होतो. सूर्याच्या संक्रमणाशी आपल्या जीवनाचे संक्रमणाही जोडले आहे. या दृष्टीने हा सण सांस्कृतिकदृष्टयाही महत्वपूर्ण आहे.
संक्रमण म्हणजे पुढे जाणे. पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते. तिथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असते. ज्या दिवशी अंधाराचे साम्राज्य संपून प्रकाशाचे राज्य सुरु झाले तो दिवस आर्य लोकांनी मकरसंक्रांत म्हणून साजरा केला. फार वर्षापुर्वी लोकांना फार पीडा देणारा शंकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याला मारणे आवश्यक असल्याने देवीने संक्रांतीचे रूप घेतले. शंकरासुराला संक्रांतीदेवीने ठार मारले आणि सगळ्या लोकांना सुखी ठेवले अशी मकरसंक्रांती सणाबद्दल आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मकरसंक्रांत म्हणजे
मकरसंक्रांत म्हणजे माधुर्याचा, स्नेहगुणाचा आणि प्रेरणा देणारा सण. मकरसंक्रांतीच्या या सणाला देशभरात विशिष्ट स्थान आहे. या सणास मराठमोळ्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते. महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण. वर्षभरात बारा राशीतून जरी सूर्याची संक्रमणे होत असली तरी भारतवासियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला अधिक महत्व आहे कारण या संक्रमाणापासून सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवाह करतो म्हणजेच सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणाकडे प्रारंभ करतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश आणि उष्णतेचा लाभ होतो.
मकरसंक्रांत हा सण भारतातील विविध प्रदेशात आणि परराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो व विविध नावाने ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यात मकरसंक्रांती किंवा संक्रांत या नावाने ओळखला जातो, तर काही भागात पोंगल असेही म्हणतात. तर पंजाब मध्ये लोहाडी, बिहार मध्ये संक्रांती, आसाम मध्ये भोगली, बिहु गुजरात व राजस्थान मध्ये उत्तरायण, पतंगाचा सण पश्चिम बंगाल व ओडिशा मध्ये मकरसंक्रांत या नावाने ओळखले जाते. तसेच भारताबाहेरील अन्य भागातही हा सण साजरा केला जातो. थारु लोक माघी थायलंडमध्ये सोंग्क्रान लाओस मध्ये मिमालाओ, म्यानमार मध्ये थिंगयान तर नेपाळ मध्ये माहे संक्रांती असे म्हणतात. हा सण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठ्या उल्हासाने, उत्साहाने, भक्तिभावाने आणि आदरपूर्वक साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये स्त्रिया एकमेकींना भेटवस्तू व वाण (गाजर, हरभरा, ऊस, पेरू, वाटाणे इ. शेतीमधून मिळणाऱ्या भाज्या आणि फळे यांचे तयार केलेले मिश्रण) देतात. एकमेकांमधील मैत्री, प्रेमभाव, स्नेह असेच जुळून रंगू देत अशी प्रार्थना करतात. तसेच लहान मुले व मोठी माणसे तीळ आणि गुळ यांच्यापासून बनवलेले लाडू चिक्की एकमेकांना देत “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला” असा संदेश देऊन स्नेहभाव टिकवणाच्या प्रयत्न करतात तर लहान मुले उंच आकाशी पतंग उडून आनंद व्यक्त करतात तर पंजाब हरियाणा मध्ये या दिवशी रात्री आग लावून तिची पूजा करुन त्यात तीळ, गूळ, तांदूळ भाजून घेतले जाते यास तीलचौली असेही म्हणतात.
महामेले
इलाहाबादमध्ये हा सण महामेले म्हणून ओळखला जातो. या दिवशी अंघोळ केल्यानंतर दान देण्याची प्रथा आहे. तर बागेश्वर येथे मोठी यात्रा भरते. रामेश्वर, चित्रशिलाव आणि अन्य ठिकाणी सुद्धा ब्राह्मणांना दान देण्याची प्रथा आहे. हाच सण उत्तरप्रदेश मध्ये खिचडीवृत्त म्हणून साजरा केला जातो. येथे या दिवशी खिचडी शिजवून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे. मकरसंक्रांती या दिवशी भारतामध्ये विविध पवित्र धर्मक्षेत्रावर यात्रा आयोजित केल्या जातात. यात प्रमुख आकर्षण म्हणजे दर बारा वर्षांनी आयोजित करण्यात येणारी ‘कुंभमेळा’ यात्रा नाशिक, उज्जैन, हरिद्वार या पवित्र धर्मक्षेत्रांवर आयोजित करण्यात येते. या यात्रेची लोक मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा करतात.
याशिवाय कोलकत्ता शहरानजिक जेथे गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळते तेथे ‘गंगासागर’ यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेस भारतासह परराष्ट्रातूनही लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, “सारे तीर्थ बार-बार गंगासागर एक बार” याच दिवशी गुजरातमध्ये जागतिक पातळीचा पतंगोत्सव आयोजित केला जातो.
तीळाचे महत्व
मकरसंक्रांती या सणात तिळास अधिक महत्व आहे. या दिवशी लोक तिळाचे तेल मिसळलेल्या पाण्याने व तिळाच्या सुगंधी उटण्याने स्नान करतात. तसेच तीळ हवनही करतात. या दिवशी लोक जेवणात मोठ्या प्रमाणात तिळाचा वापर करतात. या दिवशी दानधर्मास धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व आहे.
![]() |
तीळगुळ |
मकरसंक्रांत म्हणजे पारंपरिक स्नेह आणि मधुरतेच्या वृद्दीचा महोत्सव आहे म्हणून आपण प्रेमाचे प्रतिक तीळ आणि मधुरतेचे प्रतिक गुळ एकमेकांना देऊन “तीळगुळ घ्या, गोडगोड बोला” असे म्हणत झालेल्या सर्व चुकांची माफी मागून व वैराला विसरून नवी प्रेमळ नाती जोडतो. अश्या प्रकारे आपण स्नेह, प्रेम, माधुर्य आणि प्रेरणेने भरलेला मकरसंक्रांत हा सण साजरा करूया, गोडगोड बोलूया. तिळगुळ खाऊया. रुसवे - फुगवे विसरून मकरसंक्रांत हा सण स्नेहगुणाने आणि माधुर्याने साजरा करूया.
सर्व वाचकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
- अर्जुन फड
अभिप्राय