Loading ...

ओळखीचे वाटले ते (मराठी गझल)

ओळखीचे वाटले ते (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार सुहास बोकरे यांची ओळखीचे वाटले ते ही गझल.

ओळखीचे वाटले ते (मराठी गझल)

गंध जे चर्चेत आले ओळखीचे वाटले ते


ओळखीचे वाटले ते (मराठी गझल)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार सुहास बोकरे यांची गझल ‘ओळखीचे वाटले ते’.



गंध जे चर्चेत आले ओळखीचे वाटले ते
त्या कळीचे पुष्प झाले ओळखीचे वाटले ते

नेहमी 'येते' म्हणाली जायच्या वेळीच तू ही
ओठ जेव्हा 'या' म्हणाले ओळखीचे वाटले ते

काल हिंदळले जरासे गार पाणी झाकलेले
भावनांना बंद प्याले ओळखीचे वाटले ते

कागदाच्या कैक होड्या त्यात स्वप्नांच्या सवाऱ्या
ढीग होड्यांचे बुडाले ओळखीचे वाटले ते

वाकलेल्या त्या तृणांचे टोक ही निष्काम आहे
कोयत्यांना कुंद भाले ओळखीचे वाटले ते

- सुहास बोकरे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची