Loading ...
/* Dont copy */

जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख)

जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक हेमंत देसाई यांचा जागतिकीकरण आणि भारतीय शेती हा मराठी लेख.

जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख)

जागतिक वातावरण प्रतिकूल असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था हंसाच्या चालीने मार्गक्रमण करीत आहे.


जागतिकीकरण आणि भारतीय शेती

विकासातील अडथळे, समस्या व गुंत्ते समजावून घेऊन जागतिक, राष्ट्रीय, राज्याच्या पटावर त्यांबाबतची व्यूहरचना कशी असावी याविषयी विचारमंथन करायला लावणारा लेख.



चिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, ओरिसा अशा काही राज्यांनी आर्थिक-सामाजिक विकासावर भर देऊन बदल घडविला. आज केंद्र व राज्य स्तरांवर सर्वांगीण विकास करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. विकासातील अडथळे, समस्या व गुंत्ते समजावून घेऊन जागतिक, राष्ट्रीय, राज्याच्या पटावर त्यांबाबतची व्यूहरचना कशी असावी याविषयी विचारमंथन करणारे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा हा लेख.

जागतिक वातावरण प्रतिकूल असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था हंसाच्या चालीने मार्गक्रमण करीत आहे. २०१०-२०११ च्या द्वितील तिमाहीत राष्ट्रीय ठोक उत्पादनाचा (बीडीपी) वेग ८.९ टक्के होता. चलनवृद्धी आणि मालमत्तेचे भडकलेले भाव या समस्यांवर मात करत आपण इतकी प्रगती केली आहे, हे उल्लेखनीय होय. भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक आणि राजकीय गोंधळातही आपली अर्थ व्यवस्था खचून गेलेली नाही. विशेष म्हणजे कृषी उत्पादन ४.४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या तीन वर्षातील हा विक्रम आहे. शिवाय २००९ मध्ये दुष्काळ होता, म्हणजे शेतीतील कुंठितावस्थेतून आपण बाहेर आलो आहोत.

कारखानदारी क्षेत्रातील वृद्धीवर १३ टक्के वरून ९.८ टक्के वर आला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शेअर बाजार घसरला परंतु खाजगी क्षेत्राची मागणी वाढली असल्याचे जीडीपीचे आकडे दर्शवितात. २००८ व २००९ मध्ये मंदी होती. तेव्हा केंद्र सरकारने जाणीवपूर्वक आपला खर्च वाढविला. आता वित्तीय तूट घटविण्याकरीता सरकारी खर्चास कात्री लावण्याचे प्रयत्न होत असतानाच खाजगी क्षेत्राने खर्च वाढविला आहे. सिमेंट पोत्यांची वाहतूक, कार्सचा खप, हवाई प्रवासाची बुकिंग वाढली आहेत. याचाच अर्थ ग्राहकांचा खर्च वाढलेला आहे. त्यात शेतीचे पुनर्जीवन झाल्याने ग्रामीण मागणी फोफावणार आहे.

खासगी उपभोग, सार्वजनिक खर्च व स्थावर मालमत्तांची उभारणी यांच्यात १० टक्के पेक्षा जास्त प्रमाणात भर पडली आहे. व्याजदर स्थिर आहेत. कॉर्पोरेट गुंतवणुकीचा वेग वधारला तर देश आणखी सुस्थितीत येऊ शकेल. चालू वर्षाअखेर कृषी उत्पादन वाढीचा वेग ७ टक्के वर जाईल, असा होरा आहे. खरिपाचा वेगच गेल्या वर्षापेक्षा ३ टक्क्यांनी जास्त आहे. शेती भरभराटली की ६५ टक्के लोकांच्या खिशात जास्त पैसा खुळखुळायला लागतो. कारण तेवढी जनता शेतीवर गुजराण करते. शेतकऱ्यांनी हा पैसा खर्च केला की औद्योगिक माल/वस्तूंचा खप वाढतो. २००९-२०१० त विकासदर ७.४ टक्के होता.

२०१०-२०११ मध्ये तो ८.५० ते ९ टक्के असेल. गतवर्षीची प्रगती साधली गेली ती उत्पादन व सेवा क्षेत्राच्या बळावर तर यंदा शेतीच्या बळावर पण ही दोन क्षेत्रे कूर्मगतीने विकास करत असतील, तर फक्त कृषीच्या भरवशावर देश फार मोठी मजल मारू शकत नाही. कारण शेतीमधून फक्त १६ टक्के जीडीपी मिळतो.

कृषीमध्ये हे परिवर्तन आले कसे? कृषी कर्जावरील व्याजदर मध्यंतरी २ टक्क्यांनी कमी करण्यात आला. शहरीकरणामुळे जनतेच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत. त्यामुळे उच्च किंमतीची व प्रतीची पिके घेतली जात आहे. २००६-०७ मध्ये ४ टक्के, २००७-०८ मध्ये ४.९ टक्के, २००८-०९ साली १.६ तक्के व २००९-१० मध्ये केवळ ०.२ टक्क्यांनी कृषी उत्पादन वाढले. गेल्या वर्षीचा पाया कमी असल्याने यंदाची तुलनात्मक वाढ जास्त भासते. शेतीचे चित्र पालटण्याची ही कारणे आहेत.

यंदा तांदूळ पिकात ५.९ टक्के, कडधान्ये ११ टक्के, डाळीत ३९ टक्के आणि तेलबिया उत्पादनात १० टक्के भर पडली आहे. शिवाय रिटेल, वाहतूक या सेवा व्यवसायांना ५० टक्क्यांनी विस्तार झाला. केंद्र सरकारने २००८-२००९ मध्ये फिस्कल स्टिम्युल्सवर जीडीपीच्या ३.५ टक्के खर्च केला. सरकारने दिलेल्या सवलतीचाही उपयोग झाला.

शेतीने भरारी घेतली. अर्थात कृषीविकासासाठी जरूर असलेल्या सर्व गोष्टी घडून आल्या आहेत, असे नव्हे उदाहरणार्थ केंद्रीय अर्थखात्याने खतांच्या किमंतीवरील निर्बंध हटवावेत, असा प्रस्ताव बनविला. पण खत मंत्रालयास तो मान्य नाही. त्याने आपली नवी किंमत योजना बनवली. त्यामुळे न्युट्रिअंट बेस खत धोरण (चालू अर्थसंकल्पात घोषित झालेले) अंमलात येऊ शकलेले नाही. खताचे भाव उत्पादन खर्चाधारीत असले पाहिजेत. पण युरियाची विक्री किंमत ठरविण्याची खत मंत्रालयाची पद्धत गुंतागुंतीची आहे. कारखानदारास रास्त रिटर्न मिळायलाच पाहिजे. हे घडत नाही. म्हणून सरकारने प्रत्येक कारखान्यास भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यानंतर बाजारभावातील विक्री किंमत व सरकारने ठरवलेली वाजवी किंमत यातील फरक शेतकऱ्यास प्रत्यक्ष अनुदान म्हणून द्यावा.

स्फुरद खतांच्या तुलनेत युरियाचे भाव तुलनेने वाढणे खत उद्योगाच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने दीर्घकालीन हिताचे आहे. जगामध्ये लोकसंख्येबाबत भारत दुसरा आहे. तंत्रज्ञानात तिसरा आणि संशोधनात नववा आहे. दूध, बटाटे, साखर, अंडी उत्पादनात आपण क्रमांक एकवर आहोत. तर तांदूळ-गहू निर्मितीत जगात दुसरे, जगामधील ३३ टक्के गुरांची पैदास भारतात होते. ४० टक्के मसाले इथे बनतात. भाजीपाला व फलोत्पादन खूप होते. परंतु जागतिक व्यापारात आपला जेमतेम एक टक्का हिस्सा आहे.

भारताची लोकसंख्या १२५ कोटीच्या आसपास आहे. पण जनतेने केवळ साडेतीन कोटी आयुर्विमा पॉलिसीज काढल्या आहेत. आरोग्य विमा ६० लाख लोकांनी काढला आहे.अमेरिकेत भारतीयांची खासगी मालमत्ता १२०० अब्ज डॉलर्स आहे. भारतीयांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. गणितात नैपुण्य आहे. भारतात ४% भरपूर श्रीमंत व्यक्ती आहेत. या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे शेती विकासातच नव्हे तर एकूण विकासातही भारत भविष्यात पुढे जाणार हे नक्की. कोकणातले कोकम, कणकवलीचे आवळे, पुण्याचे पेरु, वसईची केळी, बारामतीची द्राक्षे, देशावरचा गहू, कोल्हापूरचा ऊस आणि सोलापूरचा कुंदा जगभर गेला पाहिजे, असे स्वप्न आपण दृष्टीसमोर ठेवायला हवे.

भारतात ६५ कोटी शेतकरी आहेत. तर युरोपात ५० लाख व अमेरिकेत २० लाख. आयटी व औषध उद्योगात आपले स्थान उंचावर आहे. शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विदेशी लोक आपल्याकडे येत असतात. राजकीय स्थैर्य, लोकशाही, कुशल मनुष्यबल वाजवी कर या बळावर भारत पुढे चालला आहे.

२५ वर्षापूर्वी भारत व चीनचे जीडीपी सारखे होते. आता चीनच्या विकासाचा वेग अमेरिकापेक्षा अधिक आहे. टाचणी ते मोबाईलपर्यंत आणि खेळण्यांपासून कारपर्यंत सगळ्या तऱ्हेच्या वस्तू चीन जगभर पाठवतो. जगातील सर्व बड्या कंपन्या चीनमध्ये आल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्याचे मुख्य उत्पादन केंद्र चीन हेच आहे. विमानतळ, बंदरे, रस्ते, वीज पायाभूत सुविधा देण्यात चीनने कमाल करुन दाखवली आहे. चीनमधील श्रमविषयक कायदे ठराविक आहेत. त्यामुळेच चिनी उत्पादने भारतातही प्रचंड प्रमाणात येतात. चीनी पणत्या, दीपमाळ दिवाळीत घराघरात दिसल्या. शाळेचे दप्तर, जेवणाचे डब्बे, मोबाईल बॅटरी, हॅंडसेट, सायकल व ट्रान्झिस्टर अशा नानाविध चीनीवस्तू इथल्या बाजारपेठेत दिसतात.

भारतीय उद्योगजकांनाही याप्रकारे यश मिळविता येईल. पण त्यासाठी युरोप-अमेरिका व आशियाई बाजार समोर ठेऊन त्यानुसार उत्पादने बनवावी लागतील. संशोधन-विकासावर भर द्यावा लागेल. जैव तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम संधी आहेत. जागतिक स्पर्धेचा अभ्यास करावा लागेल. केंद्रात व राज्यात सिंगल विंडो क्लीअरन्स पद्धती हवी आणि नुसती घोषणा नको, ती अमलातही आणली जावी.

जागतिक व्यापार संघटनेचे १३५ देश सदस्य आहेत. नियमाधारित व्यापारप्रणाली बनविणे व तिच्यावर देखरेख ठेवणे हे संघटनेचे काम आहे. डब्ल्युटीओत अमेरिका, युरोप व जपानची दादागिरी चालते. जागतिकीकरणानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार २५ टक्केनी वाढला असला, तरी त्याचे लाभ समन्यायी पद्धतीने वाटले गेले आहेत. जगातील अविकसित देशात २० टक्के लोक राहतात. पण नफ्यातील त्यांना वाटा ०.३ टक्के आहे. तर २० टक्के जगातील श्रीमंत देशांचा जागतिक व्यापारातील नफ्यातील हिस्सा आहे ८६ टक्के.

युरोपात अंडी उत्पादकांना अनुदान दिले जाते. डेन्मार्कमध्ये कुक्कुट निर्यातीवर १०० टक्के अनुदान मिळते. अमेरिकेत शेतकऱ्यांना वर्षाला ३० हजार डॉलर्सचे अनुदान मिळते. काही वर्षापूर्वी कॅनकुन कामगार वगैरे विषय जागतिक व्यापार करारात घुसविण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे शेती असो वा उद्योग प्रगत देश आपला स्वार्थ जपतात. आपण हेच केलं पाहिजे, त्यासाठी डब्ल्युटीओला विरोध न करता, तेथे जाऊन भारताची बाजू समर्थपणे मांडली पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅनकुनमधील जागतिक पर्यावरण परिषदेत भारताने भाग घेतला. त्यामधील भारताची भूमिका बदलती असली, तरी या परिषदेत आपण आता महत्त्वाची भूमिका वठवू लागलो आहोत, हे बाकी खरे.

जागतिकीकरणानंतर यंत्रे, सुटे भाग यांची भारतात होणारी आयात वाढली. एनआरआयच्या ठेवी, विदेशी गुंतवणूक, व्यापारी कर्जे यात भर पडली. वित्तीय जागतिकीकरण आले. १९८० च्या दशकात भारताची निर्यात जीपीडीच्या ५ टक्के होती, आज ती १० टक्के च्या आसपास आहे. सोविएत संघराज्य कोसळल्यावर भारतीय शेतीमाल निर्यातीस फटका बसला.

जागतिक सेवा निर्यातीतील वाढीचा वेग १० टक्के आहे, तर भारताचा ४५ टक्के. १९९५ मध्ये भारताचा सेवा निर्यातीतील हिस्सा अर्धा टक्का होता. आज तो ३ टक्के वर गेला आहे. ६० टक्के पदवीधर व ८० टक्के इंजिनियर्स सेवा योजनात काम करत आहेत. ही क्रांती शेतीत पोहोचायला हवी. कारण शेतीत समाधानकारक वाढ झाली नाही तर देशातील विषमतेची दरी संभवते.

बाकी सगळ्या बाबी थांबू शकतात. पण शेती अधिक काळ प्रतीक्षा करु शकत नाही, असे उद्गार पं. नेहरुंनी काढले होते. पूर्वी भारतात पी एल ८८४८० करारांर्गत अमेरिकन गहू इथल्या गोरगरिबांची भूख भागवत असे. १९७० च्या दशकात हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळाली. धान्य पिकांच्या अधिक उत्पादक वाणांचे बी-बियाणे आणण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री सी. सुब्रमण्यम आणि कृषीशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांनी घेतला.

भारतात शेती विकासाच्या शक्यता मुबलक आहेत. कारण उपजाऊ तसेच पडीक जमिनी उदंड आहेत. उपलब्ध पाण्याचा पर्याप्त वापर भूगर्भतील जलसाठ्याचे पुनर्भरण होण्यासाठी ठिंबक सिंचनाबरोबर पावसाच्या पाण्याचे संचयन करण्याच्या पद्धतीचा अवलंब करता येईल. शेती उत्पादनात वृध्दी घडविण्यासाठी जैन तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल.

भारतीय कृषि शास्त्रज्ञांनी भूईमुगाचा जनुकीय आराखडा तयार केला आहे. शेतीकरिता व वनीकरणासाठी वापरण्याजोग्या वनस्पतींचा विकास घडविण्याचे तंत्र शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. या वनस्पतीच्या वृद्धीकरिता कमी पाणी लागते. त्यांच्यात पोषक मुल्ये खूप असतात. जमिनी वा पाण्याच्या साठ्यांवर किमान ताण येईल अशाप्रकारचे तंत्र विकसित होत आहे. शाश्वत शेतीसाठी जैन तंत्रज्ञान कसे वापरता येईल, हे सरकारला बघावे लागणार आहे.

भारतात दरवर्षी १२ हजार शेती पदवीधर तयार होतात. त्यापैकी फक्त २ हजारांना नोकऱ्या मिळतात. बाकी बेकार राहतात. देशभर, खेडोपाडी कृषिसंलग्न व्यवसाय केंद्र उभारण्याची सरकारची योजना आहे. या केंद्रांचे काम हे पदवीधर पाहतील. शेती अवजारे खते, किटकनाशके यांचे विक्री प्रतिनिधी म्हणूनही ते काम पहातील. शेतकऱ्यांना हवी ती माहिती व ज्ञान देतील. ग्रामीण भागात ३२ लाख टनांची साठवणूक करणारी गोदामे बांधण्याची योजना आहे.

त्यामुळे हंगाम झाल्या झाल्या पडेल त्या भावाने आपला माल व्यापाऱ्याला विकण्याची पाळी शेतकऱ्यावर येणार नाही. त्याला तो साठवून ठेवता येईल. शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती मिळत नाही, हे लक्षात घेऊन देशभरातील घाऊक बाजारपिठांची ऑनलाइन कनेक्टीविटी त्यास उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शेतमालाची विक्री व्यवस्था स्पर्धात्मक व पारदर्शी बनावी म्हणून सर्व राज्यांनी शेतमालाच्या विक्रीला मॉडेल अ‍ॅक्ट राबवावा असा केंद्राचा आग्रह आहे.

भारतात ४८ लाखांचे पशुधन आहे. त्यात १९ कोटी गायी आणि १० कोटी म्हशी जगात पशुधनात आपण अव्वल आहोत. दूध उत्पादनात अग्रभागी आहोत. मात्र जागतिक तुलनेत इथली पशुधनाची उत्पादकता अत्यल्प आहे. सुदृढ जाती-प्रजातींच्या जनावरांची निपज करण्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे, संकरीत गोधनाचे प्रमाण आज जे १२ टक्के आहे ते २० टक्के पर्यंत नेणे या गोष्टी कराव्या लागतील. अनेक सहकारी दुध संघ आजारी आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.

भारतातील मच्छिमारी उत्पादन ६० लाख टन आहे. ते वाढावावे लागेल. त्यासाठी राष्ट्रीय मत्सपालन विकास मंडळ स्थापावे लागेल. मच्छिमार बोटीचे यांत्रिकीकरण, उत्पादनोत्तर कार्यासाठी सुविधा पुरवणे, पुरेसे मत्सबीज व खाद्य पुरविणे या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. आज ग्रामीण भागात कृषिसंलग्न व्यवसायावर बऱ्याच लोकांचे पोट अवलंबून आहे. या व्यवसायाना जोखीम भाग भांडवल पुरविणे, त्यांना प्रकल्पाचे आराखडे तयार करुन देणे. यासाठी केंद्राची स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्रीबिजनेस कन्सॉर्शियम एक योजना तयार करत आहे. त्या अंतर्गत ज्या उत्पादनांना खात्रीशीर बाजारपेठ मिळेल, अशांवर भर दिला जाणार आहे.

राज्यामधील रेशन व्यवस्थेसाठी राज्य शासनांना भारतीय अन्न महामंडळावर जास्त विसंबून रहावे लागू नये तसेच त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर बाजारभावांची हवी मिळावी हे युपीए सरकारचे धोरण स्वागतार्ह आहे. पूर्वी खरेदी केंद्रापासून गोदामामार्फत व तेथून भाताच्या गिरणीपर्यंत वाहतुकीचा करावा लागणारा खर्च केंद्र देत नसे. आता तो दिला जातो.

खरेदी कार्यात राज्य सरकारने समाविष्ट करून घेतलेल्या संस्थाना किमान किमतीच्या १ टक्के कमिशन दिले जाऊ लागले आहे. तसेच गोण्यांच्या वाहतुकीच्या खर्चाची शंभर टक्के भरपाई राज्य सरकारांना केली जाऊ लागली आहे. थोडक्यात विकेंद्रीत अन्न खरेदी योजनेमुळे केंद्राचा अनुदानावरील खर्च वाचला आहे व राज्यांनाही रेशन व्यवस्था राबविण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. विविधांगी प्रयत्न झाले आणि हवामानाने साथ दिली, त्यामुळे देशातील शेती उत्पादनात उल्लेखनीय भर पडली आहे. परंतु तरी कमी आहे.

शेतकरी व बाजारपेठ यांचा नीट सांधा जुळलेला नाही. त्यामुळे अडते, दलाल शोषण करतात. बियाणे कंपन्या फसवतात. कॉर्पोरेट वा कंत्राटी शेतीबद्दलचे धोरण निश्चित नाही. उद्योग प्रकल्प वा सेझसाठी ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत. जमिनी विकून त्या पैशावर मौजमजा करण्याची वृत्ती वाढत आहे. सामाजिक आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होत आहेत. आता आपण महाराष्ट्रकडे वळू या, महाराष्ट्रात मुख्यतः जिरायती शेतीच आहे.

भारतातील एकूण ४३ टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे, तर राज्यातील एकूण लागवडीखाली जमिनीपैकी १७ टक्के जमीनच भिजलेली आहे. पंजाबात खतांचा दर हेक्टरी वापर १७३ किलो, तामिळनाडूत, १४३ किलो, तर महाराष्ट्रात अवघा ७६ किलो! दुबार पिके घेण्याबाबती राज्याचा देशात १८ वा क्रमांक लागतो. ऊस वगळता सर्व शेतकरी उत्पादनांची हेक्टरी उत्पादकता महाराष्ट्रात राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी आहे. आपल्याला जेवढे धान्य लागते, त्यापैकी ८० टक्के धान्यच आपण पिकवितो. बाकी इतर राज्यातून वा देशातून आणतो.

अन्नधान्यात प्रारंभापासून महाराष्ट्र हे तुटीचे राज्य आहे. १९६०-७० च्या दशकात देशातील बहुतेक राज्यांनी प्रकर्षित शेतीचे उपाय योजून हरित क्रांतीच्या दिशेने पाऊले टाकली. महाराष्ट्रात पाच दशकात कुंठितावस्था होती. कडधान्ये, गळिताची धान्ये या आघाडीवर आपण फारशी प्रगती करु शकतो नाही. एकूण अन्नधान्याचे राज्यात हेक्टरी उत्पादन ८८२ किलो आहे. तर देशात ते दुप्पट म्हणजे १६८९ किलो आहे. देशातील एक तृतीयांश कपास क्षेत्र महाराष्ट्रात आहे. पण राष्ट्रीय उत्पादनातही २० टक्के उत्पादनच राज्यात होते. साखर उत्पादनात आपण आगाडीवर असले, तरी ऊसाच्या हेक्टरी उत्पादनात चढ‍उतार आहे. राज्यातल्या राज्यातही उत्पादकतेत फरक आहेत.

भाताची विदर्भातील दर हेक्टरी उत्पादकता कोकणाच्या निम्मी आहे. अर्थात ऊसाच्या उत्पादकतेतही प्रादेशिक असमतोल आहे. राज्य सरकार हे चित्र बदलण्यासाठी धडपडतही आहे. पण त्यास सर्वांची साथ मिळायलाच हवी. उदाहरणार्थ तृणधान्यची हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत एक कार्यक्रम गेली १५ वर्षे राबविला जात आहे. उत्पादकता वृद्धीसाठी शेतीच्या यांत्रिकी करण्याचा प्रसार केला जात आहे. नवव्या पंचवार्षिक योजनेत त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण आपले प्रयत्न कमी पडत आहेत हे मात्र खरे. नवव्या योजनेत अन्नधान्य उत्पादनंच लक्ष होते. १७५ लक्ष टनाचे प्रत्यक्ष उत्पादन झाले. ११७ टन तेलबीया - ३५ (१९) ऊस ७०० (३६५), कापूस ३९ (२८) ही आपली कामागिरी आहे.

महाराष्ट्रात गेली २० वर्षे फळबाग विकासासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. २९ दशलक्ष हेक्टर्स पडीक जमिनीच्या उपयोग त्यासाठी करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते पुरेसे साकार झाले नाहीत. द्राक्षे, स्ट्रोबेरी, कलिंगड, आंबे, यांनी महाराष्ट्राचे नाव युरोपभर पोहचविले आहे. १४ लक्ष हेक्टर जमीन फळ लागवडीसाठी आली आहे. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पाच वर्षापूर्वी स्थापन करण्यात आले. कोकणात हापूस आंब्यासाठी, सातारा-सांगली डाळिंब, मराठवाडा केशर आंबा, नाशिक - नगर - पुणे कांदा, गोरेगाव (मुंबई) - द्राक्ष मद्यार्क फुले असे सात कृषी निर्यात विभाग स्थापन केले आहेत. सांगली, नाशिक, वगैरे ठिकाणी वाईनरी उद्योगात राज्यात २५० कोटी रु. ची गुंतवणूक झाली असून ५१ वाईन पार्कस आहेत. कांदा, लसूण, मिरची, हळद, धणे, दालचिनी अशी मसाल्याची पिके राज्यात थोडीफार होतात.



जागतिकीकरण आणि भारतीय शेती संबंधी महत्त्वाचे दुवे:


- हेमंत देसाई

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1345,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,36,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1086,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,68,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1129,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,54,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख)
जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख)
जागतिकीकरण आणि भारतीय शेती (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक हेमंत देसाई यांचा जागतिकीकरण आणि भारतीय शेती हा मराठी लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1BBsmfGg8qMNh63dBwV7-wcNKc8NsBlFin-S7v3U4MaWdcuUJ-sZPQpDlaSQDEoc313EpBTO7Dy251LasaxHmCouDdoMzHDfAE1vhwsnlcTGwr3yD4XewKTAaNg3xBZOqcjkTczTpUt2F/s1600-rw/aksharmanch-1280x720.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1BBsmfGg8qMNh63dBwV7-wcNKc8NsBlFin-S7v3U4MaWdcuUJ-sZPQpDlaSQDEoc313EpBTO7Dy251LasaxHmCouDdoMzHDfAE1vhwsnlcTGwr3yD4XewKTAaNg3xBZOqcjkTczTpUt2F/s72-c-rw/aksharmanch-1280x720.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2023/03/jagatikikaran-ani-bhartiya-sheti.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2023/03/jagatikikaran-ani-bhartiya-sheti.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची