Loading ...
/* Dont copy */

सिंह आणि उंदीर (इसापनीती कथा)

सिंह आणि उंदीर (इसापनीती कथा) - कोणासही क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये ही शिकवण देणारी इसापनीती कथा सिंह आणि उंदीर.

सिंह आणि उंदीर (इसापनीती कथा)

कोणासही क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये ही शिकवण इसापनीती कथा सिंह आणि उंदीर.


सिंह आणि उंदीर (इसापनीती कथा)

कोणासही क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये ही शिकवण देणारी इसापनीती कथा सिंह आणि उंदीर.



उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तेथे त्यास उंदरांनी फार त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने पंजात एक उंदीर धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली. ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.

पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असता, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला.

ती ओरड ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ बस.’ इतके बोलून त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

कथेचे तात्पर्य - जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतील.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची