Loading ...

मेंदीच्या पानावर (मराठी लेख)

मेंदीच्या पानावर (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक काशिराम खरडे यांचा मेंदीच्या पानावर हा मराठी लेख.

मेंदीच्या पानावर (मराठी लेख)

मेंदी तळव्यावरचं फक्त गोंदण नसून ते असतं सोळा शृंगाराच्या साखळीचा दुवा


मेंदीच्या पानावर

मेंदी... शकुनभरल्या हातांचा सात्विक सृंगार... स्त्रीमनाच्या हळूवार भावनांची तरल संवेदना... हिरव्या काकणाच्या सौभाग्यलंकाराशी एकरुप होत लज्जेची लाली झाकणारा पडदा... मेंदी... वास्तवरुपी स्वप्न नी स्वप्नवत वास्तव...



मेंदीभरले हात बये गं
सांगून जाती गुज अलवार
तळव्यावरती उमटून राही
सौभाग्याचा एक अलंकार

मेंदी... तळव्यावरचं फक्त गोंदण नसून ते असतं सोळा शृंगाराच्या साखळीचा दुवा... तळहाताचं सौंदर्य खुलवणारी नजाकत... नारीत्वाचं देखलेपण आणि अंगांग फुलवणारं अलवार गुज...

मेंदीची हिरवाई संपुष्टात येऊन पसरणारा लालिमा स्त्री सौंदर्याला आणखी खुलवत असला तरी या सौंदर्यत्वाला भावनेच्या कंगोर्‍यात बंदिस्त करण्याचं कसब लावण्यखणीकडे नक्कीच असतं. उपवर पोरीला बघायला येत असल्या पाहुण्यांसमोर जाण्याचे धाडस याच मेंदीला मिळतो. तिथुनच सुरु होतो स्वप्निल खेळ... “रंगली का गं? बाई... किती सुरेख...! तुझं सौभाग्य अबाधित आहे...” अशी मैत्रिणीकडून मिळणारी दाद तिला सुखावून जाते.

होणारा सखा कसा असेल...? रांगडा की सुकुमार... प्रेमळ की धसमुसळ्या... हुल्लड की पोक्त प्रौढ... अशा विचारात हीच मेंदीभरली बोट करत असतात चाळा वार्‍यावर उडणार्‍या केसांच्या बटेशी... हिच मेंदी पकडते घट्ट माहेरवाशिण झोक्याला... हिच मेंदी जाते उशाला. राजसची स्वप्न बघायला... त्याच स्वप्नात जातात तिचे हात त्याच्या हातात... अंगांग पुलकित करणार्‍या त्या पहिल्याच स्पर्शाचा पहिला साक्षीदारही मेंदीच... त्याचं पहिलं चुंबनही याच मेंदीला... अगदी तिच्याही आधी...

मेंदीच्या हातांची आतुरता


हवहवंसं वाटत असतानाही सोडवून घेण्याची केविलवाणी धडपडही याच मेंदीभरल्या हातांची... त्याच्या उबदार ओठांचा पौरुषी स्पर्श मिळण्याचा पहिला मानही याच मेंदीला... त्याचा स्पर्श जसजसा पुढे जातो तशी मेंदीही शहारते, मोहरते, फुलारते, उमलतेही नकळत... पाकळी पाकळी उमलत जावी तशी कळीचं फुल व्हायला आतुरते.

“नको ना...!” असा लाडिक आर्जव करणार्‍या हातांच्या आधी त्याला स्पर्शते ती मेंदीच. कवेत घेऊ इच्छिणार्‍या त्याच्या रांगडेपणाला थोपवणारी मेंदीच. पण वरवरचं हं...! आतून तिलाही तो मर्दानी स्पर्श कैद करायचा असतो घट्ट मिठीत... करकचून व्हायचं असतं चोळामोळा... मिठीत कधी स्थिरावलो याचं भानही नसतं... त्याच्या छातीवरील केसांशी चाळा करत फिरतात हिच मेंदीभरली बोटं त्याच्या मानेवर... विश्वासाचं कोंदण लाभल्यावर हिच मेंदी धारण करते निलाजरेपणाचं सोंग. फिरते त्याच्या पाठीवर... होते अधिक आसक्त, अधीर, उतावीळ.

त्याच्या हाताच्या पंजाशी होतात एकरुप मेंदीभरले हात... रात्र चढत जाते, मेंदी फुलत जाते... तिचा रक्तवर्णी लालिमा पसरतो देहभर... मेंदीच्या कौमार्याचं हिरवेपण कधीच गळून पडलेलं असतं... उरते फक्त लाली, ओठांवर, गालावर, मानेवर... रात्रीच्या गुलाबी खुणांच्या रुपात.



मेंदीच्या पानावर संबंधी महत्त्वाचे दुवे:


- काशिराम खरडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची