Loading ...

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एक पर्व (मराठी लेख)

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एक पर्व (मराठी लेख) - आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत [Ekvisavya Shatakatil Stri,Marathi Article].

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एक पर्व (मराठी लेख)

प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय?


२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एक पर्व (मराठी लेख)

आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत.



१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वातंत्र्य झाला व भारत देशाने लोकशाहीचा पुरस्कार केला. देशाचा कारभार राज्यघटना पद्धतीने व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली.

संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या आणि दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. तो दिवस आपण ‘गणतंत्र दिन’ किंवा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.

प्रजासत्ताक दिनादिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते यात भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे / क्षेपणास्त्रे, रणगाडे, अग्निशमन यांसह संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

२०१८ साली महाराष्ट्राच्या या चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबरी’ उभारण्यात आली होती. शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही साकारली गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण १० कलाकार होते. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शविण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीतांची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर केली गेली होती.

“अतिथि देवो भवः”


या उक्तीप्रमाणे आपण सन १९५० पासून भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सण आणि उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो, त्या प्रमाणेच संपूर्ण भारतीय ‘प्रजासत्ताक दिन’ हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहाने, उल्हासाने आणि प्रेमाने साजरा करतात.

“आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत!”

- अर्जुन फड

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची