ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचीह्या नभाने ह्या भुईला दान द्यावेही प्रसिद्ध कविता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोष होता शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे!
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा