संविधान - मराठी कविता

संविधान, मराठी कविता - ती म्हणाली मला सती जायचयं, मी संविधान वाचण्यात व्यस्त होतो.
संविधान - मराठी कविता
चित्र: हर्षद खंदारे
कवी के तुषार यांची संविधान ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
कवी: के तुषार, आवाज: हर्षद खंदारे

ती म्हणाली मला सती जायचयं मी संविधान वाचण्यात व्यस्त होतो मी काहीच विरोध केला नाही नुकतंच संविधान संपवून उठलो तिच्या हातात संविधान ठेवत म्हणालो तुला सती जायचयं तर खुशाल जा परंतु जाताना एवढं संविधान वाचून जा आणि मी तिथून निघून गेलो काही वर्षांनी मला ती पुन्हा भेटली शिक्षणाचं शस्त्र घेऊन ती झुंजताना अनेक सत्यांची वकिली करताना पुढे येऊन मला म्हणाली बाबा खरंच मला बाबा कळला वयाच्या चाळिशीत माझ्यातला विद्यार्थी जागला आता वाघिणीचे दूध पिते आहे कोर्टामध्ये न्यायासाठी गुरगुरते आहे स्वातंत्र्य, समता, समानता अस्त्रासोबत लढते आहे आणि मला कळले की माझ्यातला आंबेडकर अजून जिवंत आहे भविष्याच्या अनेक आंबेडकरांसाठी

- के तुषार

1 टिप्पणी

  1. Babasaheb yanchi jayanti Aamhi thatat sajri krto pn aamhala baba aankhi kalala nahi. Aj jar aamhala baba kalala asta tr aaj dalit samaj Khup motha zala asta...
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.