रुमाल - मराठी कविता

कवी के तुषार यांची रुमाल ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
रुमाल - मराठी कविता
चित्र: हर्षद खंदारे
कवी के तुषार यांची रुमाल ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
कवी: के तुषार, आवाज: हर्षद खंदारे

अजुनी खिशात आहे रुमाल तिने दिलेला अजुनी मिरवतो मी सदरा त्या मखमलीचा सुगंध तसाच आहे त्या दिलदार अत्तराचा अजुनी मनात गुंता, त्या अबोल उत्तराचा कळतात तिलाही आता बेधुंद सागरी लाटा काटा रूतत गेला आसवात त्या सत्तरीच्या मिळतो खुशाल आता तिजला तो दिवाना केला तिनेही मंजूर तो डाव कत्तलीचा पाहतो मी तोच आरसा त्या कालच्या हिशोबांचा उरतो कुठे? कसा मी? तो खेळ सावल्यांचा

- के तुषार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.