खुर्ची बडी चीज आहे - मराठी कविता

खुर्ची बडी चीज आहे, मराठी कविता - राजकारणावर भाष्य करणारी प्राध्यापक महेश बिऱ्हाडे यांची कविता खुर्ची बडी चीज आहे.
खुर्ची बडी चीज आहे - मराठी कविता
चित्र: हर्षद खंदारे
राजकारणावर भाष्य करणारी प्राध्यापक महेश बिऱ्हाडे यांची कविता खुर्ची बडी चीज आहे.

खुर्ची बडी चीज आहे तयाने होतो मनी हर्ष खुर्ची घाणीचे साम्राज्य तयाला अहंकारी दर्प खुर्ची आजारांचे माहेर तयाने भयानक दर्द खुर्ची समजुतीचे आगर तयास सर्वसंमत परामर्श खुर्ची अनोखे शेतं तयाची “चमचा”ने मशागत खुर्ची निर्मिती केंद्र तयाने घडती आदर्श खुर्ची अनुकरण तंत्र तयाने घडती नवन्यादर्श

- प्रा. महेश बिऱ्हाडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.