तिची उत्तुंग भरारी - मराठी कविता

तिची उत्तुंग भरारी - ८ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने कवी विवेक जोशी यांची स्वलिखीत मराठी कविता तिची उत्तुंग भरारी.
तिची उत्तुंग भरारी - मराठी कविता
चित्र: मराठीमाती आर्काईव्ह
८ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने कवी विवेक जोशी यांची स्वलिखीत मराठी कविता तिची उत्तुंग भरारी.

जी असते स्त्री करारी तीच घेते उत्तुंग भरारी काळजी, प्रेम आणि आदराने देते कुटुंबास उभारी तीच घेते उत्तुंग भरारी तीच माऊली तीच साऊली घालिते रक्ताच्या नात्याला फुंकरी जसा अखंड नंदादीप राऊळी सत्य, शिव, सुंदराची शुभंकरी तीच घेते उत्तुंग भरारी तिची शीतल पदराची साऊली जसा डेरेदार वृक्ष नदी किनारी थकले, भागले, जिंकले, हरले सारेच विसावती या प्रेमळ वृक्षावरी तीच घेते उत्तुंग भरारी सोशिक ती, आनंदाची फुले देण्यासाठी झिजते संसारी, चंदनापरी श्रीमंतीत साधी साधेपणाची श्रीमंती मांगल्याचा सुगंध दरवळतो घरी तीच घेते उत्तुंग भरारी जननी, पत्नी, भगिनी, रणरागिणी जणू अनमोल मायेची हिरकणी आधार, विश्वास, ममतेचा आशीर्वाद देवी असूनही होते ती मंदिराची पायरी तीच घेते उत्तुंग भरारी तीच घेते उत्तुंग भरारी

- विवेक जोशी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.