चुकली दिशा तरीही (ऑडिओ कविता)

चुकली दिशा तरीही, मराठी कविता - चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे, ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची प्रसिद्ध कविता.
चुकली दिशा तरीही - मराठी कविता
चित्र: हर्षद खंदारे
तो स्वतःचा मार्ग कधीही सोडत नाही, चुकण्याची भीती त्याला नाही आणि नशिबाला दोष न देत स्वबळावर जगणाऱ्या मर्दांचा उल्लेख करणारी ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांची चुकली दिशा तरीही ही कविता मराठीमाती डॉट कॉम चे वाचक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार योगेश कर्डिले यांच्या आवाजात.
कवी: विंदा करंदीकर, आवाज: योगेश कर्डिले

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायाचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे! मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांच्या कविता संग्रहातून.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.