सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथील प्राध्यापक डॉ. गणेश तरतरे यांची प्रेम कविता प्रकारातीलउन्हाळ्याच्या भर दुपारीही कविता.
चढीचं वळण असलेला रास्ता कॉलेजचा ऐन वळणावरचं भलं मोठं लिबांचं झाड उन्हाळ्याच्या भर दुपारी तू तिथे बोलावलं होतंस वर्ग मैत्रिणीच्या नजरा चोरून एका सावळ्या सखी बरोबर तू आधीच येऊन वाट पाहत होतीस वैशाखाचा वनवा मेघमनात पेटत होता मी ही जळत होतो, ते तुला ही कळतं होतं कापऱ्या ओठानीच गोठले शब्द तुझे आसुरलेली नजर झुकलेलीच राहिली पहिल्या प्रीतीची भूक भूकेलीच राहिली मी ही अधीर बावरा तुला पाहत होतो पाहता पाहता हरवत होतो सावरत होतो बोलवलंस ना, बोलना काही तरी - मी कसं बोलू, नाही कळणार रे तुला - ती अधीरता तिला माझी समजत होती गोठलेले शब्द मला तिचे भेदत होते जाताना न्याहाळला चेहरा तिने माझा न्यहाळणारे ओले डोळे मात्र मी ठेऊन घेतले माहित होते भेटणार नाही आम्ही कधी परीक्षेचा शेवटचा दिवस, कॉलेज संपलं लिंबाच्या शितल सावलीच्या साक्षीने अख्या वैशाखाच उन्हं मिळालं होतं