साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा

गाजरचा हलवा - साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा बनविण्याची पाककृती व्हिडिओसह.
साधा, सोप्पा आणि पारंपारिक गाजरचा हलवा
छायाचित्र: हर्षद खंदारे

गाजरचा हलवा करण्यासाठी लागणारा जिन्नस

 • अर्धा किलो गाजर
 • ८ - १० चमचे साखर
 • अर्धा लिटर फुल क्रिम दूध (म्हशीचे दूध)
 • ८ - १० वेलच्यांची पूड
 • आवडीनुसार ड्रायफ्रुट्स
 • केशरच्या काड्या (ऐच्छिक)
 • पाव कप तूप

गाजरचा हलवा करण्याची पाककृती

 • गाजर स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्या.
 • गाजर बारीक किसणीवर किसून घ्या.
 • किसलेले गाजर एका भांड्यात एकत्र करा.
 • गॅसवर एका भांड्यात तूप टाका.
 • तूप गरम झाल्यावर त्यामध्ये किसलेले गाजर टाका.
 • तूपामध्ये किसलेले गाजर व्यवस्थित परतून घ्या.
 • व्यवस्थित परतल्यावर त्यात सर्व दूध ओता.
 • मिश्रणात केशर घाला.
 • केसर टाकल्यावर मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.
 • गॅस मध्यम आचेवर राहू द्या आणि उकळी आल्यावर हे मिश्रण सतत ढवळत रहा.
 • दूध आटत आल्यावर त्यामध्ये चवीनुसार साखर घालून मिश्रण ढवळा.
 • वेलची पूड टाकून मिश्रण ढवळून घ्या.
 • आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप टाकून परतत रहा.
 • मिश्रण आता घट्ट होत येईल.
 • मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आणि भांड्याला चिकटणार नाही ना हे बघा.
 • तयार आहे आपला गाजरचा हलवा.

गाजरचा हलवा (पाककृतीचा व्हिडिओ)

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.