समारंभ तसेच सणासुदीचा आणि थंडीच्या दिवसातला आवडता गोड पदार्थ म्हणजे गाजर हलवा
गाजर हलव्यासाठी लागणारा जिन्नस- १ किलो मोठी गाजरे
- ३ वाट्या साखर
- पाव किलो खवा
- अर्धी वाटी तूप
- ७-८ वेलदोड्याची पूड
- थोडेसे काजूचे काप
गाजर हलव्याची पाककृती
- गाजरे किसून घ्या. नंतर हा कीस साध्या कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्या. पाणी घालू नका.
- नंतर वाफेचे पाणी निथळून घ्या. तुपावर हा कीस परतून घ्या. साखर घाला.
- साखरेचा पाक होऊन मिश्रण घट्टसर झाले की उतरा. खवा हाताने मोडून घ्या व थोड्या तुपावर परता. गाजराच्या मिश्रणात हा खवा घाला.
- वेलदोड्याची पूड व काजूचे काप घाला. नीट ढवळून मिश्रण सारखे करा.
जीवनशैली पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडिओ