तिळाची बर्फी - पाककृती
तिळाची बर्फी, पाककला - [Tilachi Barfi, Recipe] तीळ उष्ण आणि स्निग्ध पदार्थ असल्याने हा पदार्थ थंडीत खाल्ल्यास आरोग्यास उत्तम असतो, मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व असल्याने तिळ गुळ म्हणून ‘तिळाची बर्फी’ करू शकतो.
आरोग्यवर्धक, मऊ अशी तिळाची बर्फी
‘तिळाची बर्फी’साठी लागणारा जिन्नस
- २०० ग्रॅम तीळ
- २०० ग्रॅम काजूचे तुकडे
- ४०० ग्रॅम साखर
- १ १/२ वाटी सायीसकट दूध
- १/२ चमचा रोझ इसेन्स
- वर्खचा कागद (आवश्यकतेनुसार)
‘तिळाची बर्फी’ची पाककृती
- तीळ हलके भाजावेत व त्यांची पूड करून घ्यावी.
- काजूचीही पू्ड करावी.
- जाड बुडाच्या पातेल्यात साखर घालून सायीसकट दूध घालावे आणि त्याचा गोळीबंद पाक करावा.
- गोळीबंद पाक झाल्यावर त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे.
- सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे व सारखे थापावे.
- गरम गरम आहे तोवरच त्यावर वर्खाचा कागद थापावा आणि वड्या पाड्याव्यात.
- तयार आहे तिळाची बर्फी.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.