धणे-जिरे कसाय - पाककृती

धणे-जिरे कसाय, पाककला - [Dhane Jire Kasay, Recipe] उष्णता तसेच पित्तासाठी ‘धणे जिरे कसाय’ उन्हाळ्यासाठी एक चांगला उपाय आहे.
धणे-जिरे कसाय - पाककला | Dhane Jire Kasay - Recipe

उष्णता आणि पित्तनाशक असे धणे-जिरे कसाय

‘धणे-जिरे कसाय’साठी लागणारा जिन्नस

  • १०० ग्रॅम धणे
  • ५० ग्रॅम जिरे
  • २ कप दूध
  • ८ चमचे साखर

‘धणे-जिरे कसाय’ची पाककृती

  • धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत.
  • धणे, जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी.
  • ही दळलेली पूड कसायकरिता वापरावी.

‘कसाय’ची पाककृती

  • एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दूध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे.
  • त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे - जिरे पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे.
  • थंड अथवा गरम सर्व्ह करावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.