दही भेंडी - पाककृती

दही भेंडी, पाककला - [Dahi Bhendi, Recipe] चटपटीत आणि नेहमीच्या चवीत बदल म्हणून ‘दही भेंडी’ नक्की करून बघा.
दही भेंडी - पाककला | Dahi Bhendi - Recipe

चटपटीत आणि नाविन्यता असलेली दही भेंडी

‘दही भेंडी’साठी लागणारा जिन्नस

 • १०० ग्रॅम भेंडी
 • १ कप दही
 • पाव चमचा चाट मसाला
 • पाऊण चमचा साखर
 • मीठ
 • १-२ हिरव्या मिरच्या
 • हिंग
 • पाव चमचा मोहरी
 • ५-६ कडीपत्ता पाने
 • फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल
 • भेंडी तळण्यासाठी तेल

‘दही भेंडी’ची पाककृती

 • भेंडी धुवून कापडाने कोरडी करुन घ्यावीत. मग त्याचे मध्यम लांबीचे तुकडे करा.
 • कढईत तेल गरम करावे आणि भेंडी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यावीत
 • बाउलमध्ये दही घोटून घ्यावे. त्यात मीठ, साखर आणि चाट मसाला घालून नीट ढवळून घ्यावे.
 • फोडणीच्या कढईत तेल गरम करावे. तेल कडकडीत तापले कि मोहरी घालावी.
 • मोहरी तडतडली कि हिरवी मिरची, कढीपता आणि हिंग घालून दह्याला फोडणी द्यावी.
 • खायला द्यायच्या वेळेला तळलेली भेंडी दह्यात घालून एकत्र करुन खायला द्यावे.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.