मेथी मटर मलाई - पाककृती
मेथी मटर मलाई, पाककला - [Methi Mutter Malai, Recipe] चवीला कमी तिखट, सर्व आवडीने खातील अशी ‘मेथी मटर मलाई’ ही पंजाबी डीश घरच्या घरी बनवून रोटी, कुल्चा सोबत खाण्यास द्यावी.
प्रत्येकाला आवडेल अशी पंजाबी भाजी मेथी मटर मलाई
‘मेथी मटर मलाई’साठी लागणारा जिन्नस
- १०० ग्रॅम हिरवे मटार
- २ चमचे मलाई
- २ छोटे जुडी मेथी
- ४ हिरवी मिरची
- एक टोमॅटो
- २ चमचे साखर
- १ कप दूध
- ४ चमचे वाटलेला पालक
- थोडी हळद
- २०० ग्रॅम काजू
- ५० ग्रॅम खरबुज बी
- २ कारले
- ४ चमचे तेल
- १०० ग्रॅम मावा
- ४ लवंग
- ४ छोटी विलायची
- ४ काळे मिरे
- २ तेजपान
- २ चमचे आले - लसूण पेस्ट
‘मेथी मटर मलाई’ची पाककृती
- १ लिटर पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी.
- कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले - लसूण पेस्ट टाकून भाजावे.
- यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे.
- १ ग्लास पाणी, काजू - खरबुज बी पेस्ट आणि एक कप दूध टाकावे.
- १० - १५ मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.
- चांगल्या तर्हेने उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे.
- आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार आहे.
- हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे.
- थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे. आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी.
- यात थोडीसी हळद, पालक, मेथी, हिरवे मटार, मलाई, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिसळावी.
- ५ - १० मिनिट शिजवावे.
- २ चमचे क्रीम टाकावे.
- डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.