काकडी कांदा रायते - पाककृती
काकडी कांदा रायते, पाककला - [Kakadi Kanda Raayate, Recipe] अन्नपचनासाठी तसेच उन्हाळ्यात थंडावा देणारे असे ‘काकडी कांद्याचे रायते’ जेवणाची चव वाढवते.
थंडावा देणारे काकडी कांदा रायते
‘काकडी कांदा रायते’साठी लागणारा जिन्नस
- २ काकड्या
- २ कांदे
- २ हिरव्या मिरच्या
- २ वाट्या दही
- १ चमचा मीठ (किंवा जास्त)
- अर्धा चमचा साखर
- अर्धा चमचा मिरपूड
- १ चमचा जिरेपूड
- पाव चमचा लाल तिखट
- सजावटीसाठी कोशिंबीर
‘काकडी कांदा रायते’ची पाककृती
- काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे.
- पाणी न घालता दही घुसळावे.
- मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या.
- दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे. वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे.
- वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवणाचे वेळी थंडगार असावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.