सांबर मसाला - पाककृती

सांबर मसाला, पाककला - [Sambar Masala, Recipe] सांबर करायच्या वेळीच ‘सांबर मसाला’ ताजा ताजा केला तर सांबरची चव अजूनच छान लागते.
सांबर मसाला- पाककला | Sambar Masala - Recipe

खमंग आणि लज्जतदार सांबर बनविण्यासाठी सांबर मसाला

‘सांबर मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • १२० ग्रॅम धणे
 • ८० ग्रॅम जीरे
 • ३० ग्रॅम काळी मिरी
 • ३० ग्रॅम सरसो
 • ३० ग्रॅम मेथी
 • २० ग्रॅम अख्खी लाल मिरची
 • ३० ग्रॅम हळद
 • १० ग्रॅम लसणाची पावडर
 • ६० ग्रॅम चण्याची डाळ
 • ६० ग्रॅम उडदाची डाळ
 • १० ग्रॅम हिंग
 • तळण्यासाठी तेल

‘सांबर मसाला’ची पाककृती

 • दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.
 • डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.
 • वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.
 • एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.
 • सांबर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तर चव अजून छान लागते.





स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.