चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा - पाककृती

चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा, पाककला - [Churmuryancha Khamang Chivda, Recipe] सणासुदीला खुसखुशीत आणि खमंग ‘चुरमुर्‍याचा खमंग चिवडा’ घरच्या घरी तयार करा.
चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा- पाककला | Churmuryancha Khamang Chivda - Recipe

सणासुदीचा खुसखुशीत ‘चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा’

‘चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा’साठी लागणारा जिन्नस

 • २ शेर चुरमुरे
 • पावशेर चणे
 • पावशेर खारे दाणे
 • पावशेर तळलेली डाळ
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा तिखट
 • चमचा साखर
 • १ चमचा मेतकूट
 • थोडा कडीपत्ता
 • २ डाव तेल

‘चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा’ची पाककृती

 • तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा.
 • त्यात कडीपत्ता घालून परता.
 • त्यावर चुरमुरे घालून परता.
 • आता त्यामध्ये तिखट, मीठ, साखर व मेतकूट घालून परता.
 • परतून झाल्यावर चणे, दाणे व डाळ घाला. जरा परता व उतरवा. खुसखुशीत आणि खमंग चुरमुर्‍याचा चिवडा तयार आहे.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.