लहान मुलांसाठी खास पौष्टिक बदामाचा हलवा
‘बदामाचा हलवा’साठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम बदाम
- २५० ग्रॅम तूप
- २५० ग्रॅम साखर
- २ कप पाणी
- अर्धा चमचा वेलची पावडर
‘बदामाचा हलवा’ची पाककृती
- बदाम पाण्यात ६ - ७ तास भिजवा व सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. वाटतांना पाणी कमीत कमी घाला.
- एका कढईत तूप टाका व वाटलेल्या बदामाची पेस्ट टाका. मंद आचेवर भाजून घ्या.
- भाजतांना सारखे हलवत रहा. लालसर रंगाचा झाल्यावर आणि तूप सोडल्यावर त्यात पाणी टाका व सारखे हलवत रहा.
- पाणी आटल्यावर साखर टाकावी. थोडा वेळ भाजून गॅस बंद करावा.
- आता यात वेलची पावडर टाकून परतून घ्या आणि गरम - गरम वाढा.
बदामाचा हलवा फारच पौष्टिक असतो.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ