बंदिस्त - मराठी कविता

बंदिस्त, मराठी कविता - [Bandist, Marathi Kavita] बंद करुन दाही दिशांची, खिडक्या आणि दारे, बांधून घेतो स्वत:ला.
बंदिस्त - मराठी कविता | Bandist - Marathi Kavita
छायाचित्र: नॅटली ह्यूरोव.
बंद करुन दाही दिशांची, खिडक्या आणि दारे, बांधून घेतो स्वत:ला
कवी: प्रविण पावडे, आवाज: हर्षद खंदारे

बंद करुन दाही दिशांची खिडक्या आणि दारे बांधून घेतो स्वत:ला अंध वैचारिक दोरे अपमानाचे झिडकारलेले पराभवाचे कैक सोशिक क्षण चाचपून पाहिले... हताश होऊन स्वत:च्याच कोषात कुठेतरी, कधीतरी, कोणीतरी सांगितलेले बंदिस्त मनांची कवाडं उघडतात...“शब्दांनी!” तेव्हापासूनच जळी-स्थळी, सागर किनारी, सांजवेळी, निरव रजनी सोबत संवेदनांच गाणं गुणगुणतोय या साऱ्यात मनाचा दरवाजा आतून उघडावा याचाच फक्त विसर पडतोय इतकंच

-प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.