असतोस संगे - मराठी कविता

असतोस संगे, मराठी कविता - [Asatos Sange, Marathi Kavita] रोज रोज बघते मी तुला, रोज रोज बघते मी तुला.
असतोस संगे - मराठी कविता | Asatos Sange - Marathi Kavita

रोज रोज बघते मी तुला, रोज रोज बघते मी तुला

रोज रोज बघते मी तुला
रोज रोज बघते मी तुला
सकाळी सकाळी प्रथम पहाते ते तुला
स्वप्नातून उठल्यावर दिसतोस तू मला
तुझी चाहूल लागताच
आई रागवते मला
रोज रोज पहाते रे तुला
कॉलेजला जायला तू थांबतोस मला
मी आवडते ना तुला
सकाळ दुपार असतोस संगे
माझ्या पासून दूर पळून लावतोस भुंगे
घड्याळाचे काटे टोचतात का तुला
असा कॉलेजच्या रस्त्यावर सोडून देतोस मला
घरच्यांची भीती वाटतेय ना तुला
तुला पाहून संगे रागवतील मला

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.