तुझे हे सुंदर दिसणे आणी मी तुला रोज पाहणे
तुझे हे सुंदर दिसणे
आणी मी तुला रोज पाहणे
हळूच तुझे खुदकून हसणे
मग मी तुझ्या प्रेमात फसणे
तुझ्या कानावरील केसांची ती बट
तूच दाविली मला प्रेमाची ही वाट
तुझा नाजूक आणी कोमल आवाज
वेड लावितो जिवा तुझा हा साज
प्रेमाची ही किमयाच न्यारी
क्षणभरात दावे ही दुनियादारी
- कुणाल खाडे