Loading ...
/* Dont copy */

आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा)

आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा) - सावकाराकडे गहाण ठेवलेल्या जमीनीची सोडवणुक करू पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या कलेक्टर मुलाची कथा.

आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा)

सावकाराकडे गहाण ठेवलेल्या जमीनीची सोडवणुक करू पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या कलेक्टर मुलाची कथा


आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा)

(Aaba Tumhi Thambayala Have Hote - Marathi Katha) पहाटे अंगणातील झाडावर बसलेला कोंबडा आरवताच रखमाईने अंथरुण सोडले. दार उघडून बाहेर आली. पूर्व दिशा नुकतीच उजाडू लागली होती. रखमाने अंगणात ठेवलेल्या पिंपातून पाणी घेऊन चुळ भरली व घराच्या कौलावर ठेवलेली मिसरीची डबी घेऊन मिसरी दाताला लावत तिची कामाची लगबग सुरू झाली.कोपऱ्यात ठेवलेल्या चुलीत गोवऱ्या व लाकडे सारून चूल पेटवून त्यावर पाण्याने भरलेले पातेले ठेवते न ठेवते तोच त्यांच्या शेनवड गावापासून ४ कि. मी. अंतरावर वसलेल्या घोटी गावाच्या मशिदीतून मौलवींनी दिलेल्या बांगेचा आवाज कानी पडताच तिची कामाची गती वाढली. तिने घरात डोकावून पाहिले तर तिचा नवरा रामजी व मुलगा संजय अजून अंथरुणात घोरत पडलेले होते. तिने हलवून नवऱ्याला जागे केले. “अहो, उठा लवकर”, “आपल्या संजयला शहराला घेऊन जायचं नव्हं”. रखमाचे हे शब्द कानावर पडताच रामजी भली मोठी जांभई देत अंथरुणावर उठून बसला व उशाशी ठेवलेला सदरा आपल्या खांद्यावर टाकला. तंबाखू चुना मळत तोंडात कोंबला व संडासचा डबा घेऊन त्याने सरळ जंगलाचा रस्ता धरला. इकडे रखमाईने फुंकणीने चुलीचा जाळ वाढविला व त्यावर तवा ठेवला व ती बाजरीचे पीठ बडवू लागली. संजू अजून पडूनच होता.

आईची हाक


आईची हाक कानावर पडताच तोही उठून सरळ मोरीत घुसला... त्याचे दात घासणे होईपर्यंत आईने हंडाभर तापलेले पाणी त्याच्या अंघोळीसाठी बादलीत ओतताच संजयने भरभर आपली आंघोळ आटोपली. रामजी आला तो नदीवरच आंघोळ करून. रखमाईने घराला असलेल्या आपल्या वावरातील ४ - ५ भली मोठी वांगी खुडून ती स्वच्छ धुवून-पुसून धगधगराऱ्या चुलीवर भाजून लवंगी मिरची व लसूण टाकून मस्त झणझणीत भरीत केलं. दुसऱ्या चुलीवर ठेवलेल्या पातेल्यात पिवळेशार पिठले खदखदत होते. वांग्याचे भरीत, पिठले व बाजरीच्या जाड भाकरी एका स्वच्छ फडकीत बांधून ती शिदोरी रामजीच्या हातावर ठेवली व घामाघूम झालेला आपला चेहरा पदराने पुसत ती एका पारावर विसावली व तांब्याभर पाणी घटाघटा घश्याखाली उतरवित नाही तोच बैलांच्या घुंगरांचा आवाज तिच्या कानी पडला.

मागे वळून पाहते तर धन्याने आपली बैलगाडी दारासमोर आणून उभी केली. रखमा उठली व घरातून संजूची पुस्तकाने भरलेली पत्र्याची पेटी व रोज लागणारे कपडे एका पिशवीत भरून ती गाडीत नेवून ठेवली. बैलगाडीच्या खाली बांधलेल्या बाडदानाच्या झोळीत बैलांसाठी लागणारी वैरण भरली व घमेले ठेवले. संजूने आईच्या पायावर आपले डोके टेकवले व गाडीत जावून बसला. रखमाने आपल्या पदरात बांधलेला नोटा काढून संजू नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या खिशात कोंबल्या. रामजी बैलांना “चला रे” म्हणताच धूळ उडवत पळत सुटली. आतापर्यंत दाबून धरला तिचा हुंदका बाहेर पडला. पदर डोळ्याला लावत ती घरात आली व तिने देवाच्या चरणी आपला माथा टेकवला व “देवा, माझ्या संजूला खूप खूप शिकवं व मोठा साहेब कर” अशी देवापुढे विनवणी करू लागली.

हऱ्या - नाऱ्या बैलांची जोडी


इकडे हऱ्या - नाऱ्या बैलांची जोडी घुंगराचा नाद करत शहराकडे धावत होती. संजू आपले गाव दिसेनासे होईपर्यंत डोळे भरून पाहत होता. एव्हानं ऊन वाढत चालले होते. वेळ दुपारी ११ वाजेची. त्यांची गाडी आता नाशिक शहराच्या गंगापूर रोडवर स्थित असणाऱ्या केटीएचएम कॉलेजच्या दिशेने धावत होती. कॉलेज रोडवरील वर्दळ फारच वाढली होती. कुणी मोटारसायकलवर तर कुणी आपल्या कारने कॉलेजच्या दिशेने जात होते. सगळ्यांना कॉलेजकडे जाण्याची एकच घाई झाली होती. तेवढ्यात लाल रंगाचा शर्ट व निळी जिन्स पॅन्ट घातलेल्या एका तरुणाने आपल्या लाल रंगाच्या कारने बैलगाडीला जाणूनबुजून कट मारून "ऐ म्हाताऱ्या तुझा खटारा बाजूला घे" असे म्हणत.

एक घाणेरडी शिवी दिली तसा गाडीत बसलेला संजूचा संयम सुटला. त्याने बैलगाडीला खोचलेला चाबूक काढत त्याने बैलगाडी खाली उडी मारली. हे पाहताच रामजीने आपली बैलगाडी जागीच थांबवली व संजूची मानगुटी धरून पुन्हा त्याला गाडीत कोंबले व इतका वेळ गप्प बसलेल्या रामजीने आपले तोंड उघडले व संजूला उद्देशून म्हणाला, “संज्या एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव, आपल्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे व केवळ पुढील शिक्षण घेण्यासाठी तू आपले खेडे तू सोडून शहरात आला आहेस. मारामारी करण्यासाठी नाही, याचे नेहमी भान ठेव. नेहमी डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेव.

बस्स एवढेच तुझ्या या आडानी बापाचे म्हणणे आहे.” संजूचाही कंठ दाटून आला. “आबा, मला माफ करा.” एवढेच काय तो शब्द बोलू शकला. त्यांची गाडी आता कॉलेजच्या भल्या मोठ्या गेटमध्ये शिरली. रामजीने आपली गाडी एका झाडाखाली सोडली. कॉलेजच्या अॅडमिशनसाठी एका खिडकीपाशी एकच गर्दी उसळली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपल्या~s अॅडमिशनचे काही आता खरे नाही, असे त्याला वाटू लागली. थोड्याच वेळात खिडकी बंद झाली व ‘अ‍ॅडमिशन फुल्ल’ चा बोर्ड तेथे लागला.

संजू माघारी फिरला व आपल्या बैलगाडीत जाऊन बसला. समोरच्या नळावर रामजी आपले तोंड व हातपाय धुवून गाडीजवळ येऊन थांबला. तसा संजू रामजीला उद्देशून म्हणाला, “आबा, अ‍ॅडमिशनचे आता काही खरे नाही.” मुलाला हिम्मत देत रामजी उद्गारला, “बाळा, असा धीर सोडून कसे चालेल. मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या कृपेने काही ना काही मार्ग निघेल.”

भूक


गजबजलेले कॉलेज एकदम शांत झाले होते. सूर्य आता मावळतीला लागताच थंडीचा अंमल वाढू लागला होता. सूर्याची जागा आता लखलखणाऱ्या विजेच्या दिव्यांनी घेतली. दोघांनाही आता फारच भूक लागली. रामजीने गाडीतून एक पिशवी काढली. रात्रीचे जेवण बनवण्यासाठी तीन दगडे रचून एक चूल तयार केली व तो स्वयंपाक करण्यास सुरुवात करणार तेवढ्यात जांभळ्या रंगाचा वेष परिधान केलेल्या व मजबूत अंगकाठी असलेला वॉचमेन त्याच्यासमोर येऊन थांबला.

थंडीमुळे त्याने आपला पूर्णच चेहरा मफलरने झाकून ठेवला होता. रामजी उठला व त्याच्यासमोर हात जोडून म्हणाला, “राम राम दादा, मी शेनवड गावचा रामजी शिंदे व हा माझा पोरगा संजू शिंदे. याच्या अ‍ॅडमिशनसाठी आलो होतो; पण अ‍ॅडमिशन काही झाले नाही. पण जर तुम्ही होकार दिला तर आजची रात्रं इथेच काढू व उजाडताच आम्ही निघून जाऊ.” हे ऐकताच वॉचमेनने आपल्या चेहऱ्यावरील मफलर दूर करताच “साल्या राम्या हात काय जोडतोस? नाटक काय करतोस? अरे राम्या, या शिवाला हुकूम कर हुकूम. अरे, तू तर माझ्या बालपणाचा मैतर आहेस व तुझ्या बापाचे लई उपकार आहेत रे आमच्यावर.

स्वत:च्या शेताची नांगरणी करण्याचे सोडून बैल नांगर आमच्या वावरात घालून स्वत: आमच्या शेताची ही नांगरणी करून देत असे व अडचणीच्या काळात पैशांचीही गरज भागवत असे.” “अरे, तुझा बा म्हणजे देवमाणूसच होता. आता मातर माझी पाळी. तू या संज्याच्या अ‍ॅडमिशनची काय बी काळजी करू नगस. माझा पोरगा भरत शिकून लई मोठा झाला आहे व याच कॉलेजच्या ऑफिसात कामाला लागला आहे.

उद्या दुपार पोहत याचे कॉलेजात अ‍ॅडमिशन नाही करून दिले तर नाव सांगणार नाही.” रामजीने चूल पेटवली व त्यावर तवा ठेवून जाड बाजरीची भाकरी व गरमागरम पिठले बनविले. तिघांनीही चुलीजवळ बसून रात्रीचे जेवण आटोपले. दुसऱ्या दिवशी शिवाने संजूला कॉलेजच्या प्रोफेसर देशपांडे समोर उभे केले. संजूची सर्टिफिकेटस् व गुणपत्रिका असलेली फाईल त्यांच्यापुढे ठेवली. अ‍ॅडमिशन फॉर्म पाहताच ते उद्गारले, "अरे शिवा, तुला तर माहीतच आहे की कालच ॲडमिशन फुल्लं झाले आहे. आता काहीही उपयोग नाही. हे ऐकताच शिवा पुढे आला व त्याने चक्क साहेबांचे पायच धरले.

"साहेब, हे गरीब शेतकऱ्याचे होतकरू व हुशार लेकरू आहे. साहेब एस.एस.सी. च्या परीक्षेत हा आमच्या तालुक्यात पहिल्या नंबरने पास झाला आहे व पेपरातही त्याचा फोटो व नाव छापून आलं होतं साहेब. देशपांडेंनी शिवाला उठविले व डोळ्यावर चष्मा चढवून संजूची फाईल चाळू लागले व एकदम आश्चर्याने उद्गारले, “अरे शिवा हा हिरा कोठून शोधून आणलास रे”, “अरे हा तर १००% मार्क घेऊन एस. एस. सी त पास झाला आहे. मेरीट लिस्टमध्ये याचे नाव टाकून मी माझ्या अधिकारात याचे अ‍ॅडमिशन करून देतो.” असे म्हणून अ‍ॅडमिशन झाल्याचे लेटर शिवाच्या हातावर ठेवले. संजूचे अ‍ॅडमिशन झाले. कॉलेजला लागूनच मागच्या बाजूला कॉलेजच्या हॉस्टेलची इमारत होती. त्यात छोटे - छोटे रूम्स होते. प्रत्येक रूममध्ये चार विद्यार्थी राहू शकतील, अशी व्यवस्था ठेवण्यात आली होती. संजूची एका रूममध्ये राहण्याची व्यवस्था झाली. त्याच्या रूममधील इतर तिघा जणांचे राहनीमान एकदम पॉश होते व प्रत्येकाकडे स्वत:च्या मोटार सायकल्स होत्या.

कॉलेज सुरू झाले


दुसऱ्या दिवसापासून त्यांचे कॉलेज सुरू झाले. सगळेजण रंगीबेरंगी पोषाखात होते. खाकी फुल पॅन्ट, पांढरा शुभ्र सदरा वा पायात साध्या स्लिपरच्या चपला, असा संजूने पोषाख घातला होता. आज पहिला दिवस म्हणून सगळा क्लास हाऊसफुल्ल झाला होता. संजूने कशीबशी शेवटच्या बेंचवर जागा मिळवली. बेल होताच प्रोफेसर देसले सर क्लासमध्ये दाखल झाले. “गुड मॉर्निंग सर” म्हणत सर्व उठून उभे राहिले. “गुड मॉर्निंग एव्हरीबडी अ‍ॅण्ड सिट डाऊन प्लीज” म्हणत तेही खुर्चीवर बसले. “मी प्रोफेसर देसले” म्हणत स्वत:ची ओळख करून दिली व सर्वांना आपली ओळख करून देण्यास सांगितले. प्रत्येक जण उभा राहून स्वत:चे नाव गाव सांगून स्वत:ची ओळख करून देत होता.

शेवटी संजूचा नंबर आला. तो कसा बसा उभा राहिला. “मी संजय रामजी शिंदे” राहणार शेनवड गाव, असे म्हणताच सर्वजण मागच्या बेंचकडे बघू लागले. संजूच्या अंगावर शाळेचाच गणवेश बघताच क्लासमध्ये एकच हशा पिकला. संजू एकदम खजील झाला व त्याने आपली मान खाली टाकली. प्रत्येक पिरीयड एकमेकांची ओळख करून देण्यातच संपला. शेवटची बेल होताच सर्वांनी बाहेरची वाट धरली. संजू ही आपल्या रूममध्ये आला. स्वत:ला पलंगावर झोकून देत ढसाढसा रडून आपले मन मोकळे करून घेतले.

दुसऱ्या दिवसापासून सगळे त्याला ‘गावठी’ म्हणून चिडवू लागले. संजूने धीर सोडला नाही व नव्या उमेदीने तो अभ्यासाला लागला. प्रत्येक पिरियड तो अटेंड करून एकाग्रतेने सर्व विषय आत्मसात करू लागला. नवीन पुस्तक घेण्याची ऐपत नसल्याने कॉलेजच्या लायब्ररीमधील पुस्तके घेऊन लायब्ररीतच अभ्यास करू लागला. दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा ‘शिवा’ संजूच्या रूमवर आणून देत असे. संध्याकाळी मात्र रूमवर आल्यावर त्याचे रूममेट त्याला छळू लागले. कधी त्याला सिगारेट आणण्यास पाठवत तर कधी त्याला सर्वांचे कपडे धुण्यास भाग पाडत व रूमची साफसफाईचीही जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. तरी संजू हे सर्व मुकाट्याने सहन करत होता.

शिवा काकाच्या घरून रोज येणाऱ्या डबा खाण्याची त्याला लाज वाटू य लागली होती. म्हणून त्याने वर्तमानपत्र एजंटकडे विनंती करून सकाळी ६ ते प ७ या वेळात घरोघरी वर्तमानपत्रे टाकण्याचे काम मिळवले व कॅनडा कॉर्नरवर असणाऱ्या ‘गार्डा शुज’ या नावाच्या दुकानात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पार्टटाईम नोकरी पत्करली. पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत अभ्यास व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत बुटाच्या दुकानात काम करणे असा संजूचा नित्यक्रम सुरू झाला.

गार्डा शूज


‘गार्डा शूज’ दुकानाचे मालक मिनू गार्डा यांचा सातपूर, एम. आय. डी. सी. एरियामध्ये बुटांचा कारखानाही होता. युरेपियन सारखा गोरा रंग, डोक्यावर हॅट व डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. माणूस एकदम प्रेमळ व मनानेही तितकेच उदार. कुत्रे पाळण्याचा त्यांना भारी, शोक. कारखान्यात ५ व बंगल्यावर ३ असे एकंदरीत ८ कुत्रे त्यांनी पाळलेले होते. सर्व कुत्र्यांना घरचे सकस जेवण मिळत असल्याने सगळे कुत्रे एकदम गलेलठ्ठ. माणूस एकदम दिलदार. संजूच्या पायात स्लिपर पाहताच दुकानातून भारी पैकी बुट संजूला सप्रेम भेट म्हणून दिला.

आज कॉलेज उघडून सहा महिने होत आले होते. संजू रूमवरच होता. अचानक त्याच्या कानावर घुंगराचा परिचित आवाज पडला. तसा संजू दारात येऊन पाहतो तर काय त्यांची बैल गाडी येऊन थांबली. गाडीत आई व आबा होते. तो धावतच खाली आला. धावत जाऊन आबांना व आईला मिठीच मारली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तब्बल सहा महिन्यानंतर संजू आपल्या आई - बाबांना पाहत होता. हा सर्व देखावा त्याचे रूमचे सहकारी वरून पाहत होते. आता हा आपल्या बापाला सर्व काही सांगणार. आता आपली काही धडगत नाही, असे त्यांना वाटू लागले. संजू आई बाबांना वरती रूमवर घेऊन आला. बाबांच्या खांद्यावर एक भरलेले पोते होते. आत येताच त्यांनी तो कोपऱ्यात टाकले व हुश्श करत आपल्या खांद्यावरील उपरण्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला. सजूने गार पाण्याने भरलेला ताब्या त्यांच्या हाती ठेवला.

त्यांनी घटा-घटा पाणी पितच सर्व रूमवर नजर फिरवली व त्यांनी आपले तोंड उघडले. अरे पोरांनो, बाहेरच का थांबलात, या आत या. सगळे आत आले. “कसे आहात रे लेकरांनो” संजू आपल्या पत्रात नेहमी तुमचे चांगले नाव काढतो. माझे मित्र फारच चांगले आहेत. ते मला खूप जीव लावतात. वेळप्रसंगी मदतही करतात. हे वाचून फारच बरे वाटते रे, माझी चिंताच मिटते बघा, असे म्हणत त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला व संजूला म्हटले, “लेका पोते सोड व त्यातील आपल्या रानातील रान मेवा दे बघू सगळ्यांना.” संजूने सतरंजीवर पोते उलटे करून रिकामे केले. हिरव्यागार कैऱ्या, काळेभोर जांभळे, करवंदे, पिकलेल्या चिंचा, आवळे, यांचा ढिगार समोर होता. “अरे संजू, या सगळ्यांचे सारखे वाटे करून तुझ्या या मित्रांना रानमेवा दे बघू.” संजूने सर्वांना रानमेवा दिला. हा सर्व प्रकार बघून सर्वजण खजिल झाले.

त्यांनी आपल्या माना खाली केल्या. “मला आधी शिवाकडे घेऊन चल बरे”, असे म्हणत ते उठले व संजूला घेऊन बाहेर पडले व तडक शिवाच्या घरी पोहोचले. शिवा चहा पित होता. रामजीला दारात बघताच “अरे रामजी केव्हा आलास रे” म्हणत हात धरून घरात आणले. सर्वजण सतरंजीवर विसावले. थोड्याच वेळात गरमागरम कांदा पोह्यांची बशी त्यांच्या पुढ्यात आली. सगळ्यांनी पोहे फस्त केले व एक-एक कप मसालेदार चहा हाणला. नंतर गावाकडच्या गप्पा रंगल्या. रात्रीचा मुक्काम शिवाच्या घरीच करून पहाटे संजूचे आई बाबांनी आपल्या घरचा रस्ता धरला.

परीक्षेचा रिझल्ट


फर्ट्स इयर परीक्षेचा रिझल्ट लागला. सर्व विषयात चांगले मार्क मिळवून संजू क्लासमध्ये फर्ट्स आला. त्याला ‘गावठी’ म्हणणाऱ्यांची तर तोंडेच उतरली होती. सगळेजण माना खाली घालून क्लास रूमच्या बाहेर पडले. प्रोफेसर देसलेंची कन्या ‘प्रिया’ मात्र तेथेच रेंगाळत होती. संजूजवळ येत हसत मुखाने “काँग्रॅच्युलेशन अॅण्ड आय लव्ह यू” म्हणून त्याला चक्क मिठी मारली व दुसऱ्याक्षणी ती पळतच बाहेर पडली. तिला तो दिवस आठवला. प्रोफेसर देसलेंच्या घरीही संजू रोज वर्तमानपत्र टाकत असे. ती बूट होट दारात जाऊन संजूच्या हातातून पेपर घेत असे व दर वेळेस त्याला थँक्स संज म्हणत असे. एकदा ती आपली सँडल घेण्यासाठी कॅनडा कॉर्नरस्थित ‘गार्ड शूज’ मध्ये गेली. बघते तर काय? “संजू” चक्क आपल्या हातांनी नवे बुट ग्राहकांना पायात चढवत होता. हे पाहताच ती विचार करू लागली.

‘हा’ रोज सकाळी घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो. तसेच कॉलेजचे सर्व पिरियड न चुकता अटेंड पण करतो व कॉलेज संपल्यानंतर लायब्ररीत बसून अभ्यास करतो आणि सायंकाळी पुन्हा या बुटाच्या दुकानात पार्टटाईम जॉब पण करतो. आपल्या शिक्षणासाठी हा किती जिवापाड मेहनत करतो.” “काय दाखवू मॅडम सँडल की चप्पल?” हे शब्द कानावर पडताच ती भानावर हो आली. तिने “सँडल प्लीज” म्हणताच पाच-सहा सँडलचे जोड तिच्यासमोर, टाकले. तिने आपल्या पसंतीची सँडल निवडताच संजूने आपल्या हाताने च तिच्या कोमल पायात चढवत असतांना न कळत तिच्या डोळ्यातील अश्र गळून त्याच्या हातावर पडले. त्याने मान वर करून पाहिले तर ती आपले अश्रृ रुमालाने टिपत होती. त्याच्या हाताचा पायाला स्पर्श होताच तिच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला व आज रिझल्टच्या शुभमुहूर्तावर तिने आपले प्रेम व्यक्त केले.

कॉलेजला एक महिन्यांची सुट्टी लागल्याने संजूने रूमवर येऊन घरी जाण्यासाठी आपले सामान आवरून पेटीत भरण्यास सुरुवात केली, स् तेवढ्यात खाली एक लाल रंगाची कार येऊन थांबली व त्यातून लाल रंगाचा पु शर्ट व काळी जिन्स घातलेला एक तरुण खाली उतरला. सरळ जिना चढून ह वर आला व आपल्या डोळ्यावरचा काळा चष्मा काढत “अरे गावठी मला ह ओळखलेस का?” म्हणून सविचारले. अ‍ॅडमिशनच्या दिवशी यानेच आपल्या डि बैलगाडीला कट मारून घाणेरडी शिवी दिली होती. हे संजूने तात्काळ र ओळखले. “मी मनोज कापडिया व आतापासूनच तुझा नवा मित्र” असे म्हणत या नालायक मित्राला माफ कर म्हणत मैत्रीचा हात पुढे केला. संजूनेही “अरे मित्र म्हणतोस मग माफी कसली मागतोस” असे म्हणत त्याने त्याचा हात हातात घेतला. संजूने त्याला मसालेदार चहा करून दिला.

नवीन व्हीआयपी बॅग


चहापानी संपल्यावर मनोजने खाली जाऊन गाडीतून एक नवीन व्हीआयपी बॅग काढून संजूला सप्रेम भेट दिली व संजूचा निरोप घेऊन तो माघारी फिरला. ड कालचक्र वेगाने फिरत होते. नाशिकला येऊन त्याला चार वर्षे पूर्ण होत आले होते. या काळात बरेच काही घडून गेले होते. ‘शिवा’ ही ज सेवानिवृत्त होऊन गावी स्थायिक झाला होता. अभ्यासाला वेळ मिळत न नसल्याने संजूला ‘गार्डा शूज’ ची नोकरी सोडावी लागली होती व आपल्या जेवणाची व्यवस्था एका खानावळीत करावी लागली होती. नाईलाजाने त्याला ण घरून आपल्या खर्चासाठी पैसे मागवावे लागत होते.

इकडे रामजीची फारच आर्थिक कोंडी होत होती. दरमहा संजूला होणारा खर्च, स्वतःचा घरचा खर्च व शेतीसाठी लागणारा खर्च यासाठी रामजीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. देव करता करता संजू चांगले मार्क घेऊन एम. ए. झाला.

संजू आपल्या गावी आला. त्याच्यासोबत प्राध्यापक देसलेही होते. तू पौर्णिमा असल्याने सर्वत्र चांदणे पडले होते. अंगणात बसूनच सर्वांनी जेवणे आटोपली. थोड्या वेळातच अंगणात त्यांची बैठक जमली. गावचे पोलिस पाटील, सरपंच, तलाठी, शाळेचे हेडमास्टर हे सारे बैठकीत हजर होते. बैठकीचा विषय होता संजूचे शिक्षण. आपसात सल्ला मसलत झाली. संजूने पुढील शिक्षणासाठी मुंबईला जावे, असे सर्वानुमते ठरले. मुंबईत राहण्याची सोय करणे, डोनेशन देऊन चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेणे, महागडी पुस्तके विकत घेणे, वरतून क्लासची भरमसाठ फी, एकंदरीत फारच खर्च होणार होता व रामजीची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, सर्वांना ठाऊक होते. प्राध्यापक देसले सर उभे राहिले म्हणाले, "संजूच्या पुढील शिक्षणासाठी मी पंचवीस हजार देतो." असे म्हणत पंचवीस हजाराचा चेक > रामजीच्या हातावर ठेवला.

हे बघून गावचे सरपंच उठून उभे राहिले म्हणाले, 'मी माझ्यातर्फे अकरा हजार देण्याचे कबूल करतो.' पोलिस पाटील, हेडमास्टर, गावचे तलाठी, ग्रामसेवक या सर्व मंडळींनी आपआपल्या ऐपतीनुसार आर्थिक मदत करण्याचे कबुल केले. शेवटी रामजी कसा बसा उठून उभा राहिला. त्याचे डोळे पानावले होते. रामजीने बोलण्यास सुरुवात केली. "इथे जमलेल्या माझ्या गावकरी बांधवांचे व आलेल्या पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानतो व माझ्या संजूच्या पुढील शिक्षणासाठी कसलीही क कमी पडू देणार नाही व जोपर्यंत संजूचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काहीही गोडधोड खालणार नाही, अशी शपथ घेतो." असे म्हणत रामजीने त आपल्या खांद्यावरील पंचाने आपले डोळे पुसत रामजी खाली बसला. शेवटी चहापानी झाल्यावर बैठक संपली.

संजूला मुंबईला येऊन सहा महिने होत आले होते. त्याने एका नामांकित कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतले होते व डोंबिवलीमध्ये एक भाड्याची रूमही घेतली होती. त्याची पुढील शिक्षणाची वाटचाल जोमाने सुरू झाली. काळ वेगाने धावत होता. संजू आता सिव्हील सर्व्हिस परीक्षेची तयारी करत होता. तो दिवस-रात्र एक करू लागला. संजूचा दिवसेंदिवस खर्च वाढत होता व तिकडे गावी रामजीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसागणित वाढतच होता. त्याची जवळजवळ ५ एकर जमीन ही समृद्धी महामार्गासाठी सरकारने अधिग्रहण केली होती व तिचा मोबदला म्हणून मिळणारी रक्कम ही सरकारी दरबारी लालफितीत अडकून पडली होती व उरलेली १० एकर जमीन ती सावकाराकडे गहाण पडली होती. आता मात्र रामजी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून संजूचा खर्च भागवत होता. संजूला याची पुसटशीही कल्पना नव्हती. संजू सिव्हील सर्व्हिस परीक्षेची जोमाने तयारी करीत होता.

परीक्षा दोन दिवसावर


परीक्षा दोन दिवसावर येऊन ठेपली असतांना ‘शिवा’ संजूच्या रूमवर अचानक धडकला. शिवाला पाहताच ‘शिवा काका’ कसा आहेस? असे म्हणत त्याला मिठीच मारली. तसा ‘शिवा’ ढसढसा रडू लागला. संजू एकदम घाबरला. त्याचे सांत्वन करत पाण्याचा ग्लास त्याच्या हातावर ठेवला. थोड्या वेळात शिवा शांत झाला व त्याने तोंड उघडले. “संज्या, अरे गावी काय घडले आहे, याची तुला जराही कल्पना नाही का? तुझ्या या शिक्षणासाठी तुझ्या आबाने आपली शेतजमीन सावकाराकडे गहाण ठेवली व स्वतः मातर दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून राबतो आहे. त्याचा डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत आहे. तेव्हा तू परीक्षा संपताच लवकरात लवकर गावी ये.” असे म्हणून शिवा गावी परतला.

संजू आता सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा पास झाला होता व नाशिकचे ही कलेक्टर ‘कृष्णन्‌’ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले होते व तीन दिवसात संजूने मी त्यांचा पदभार सांभाळावा, असा सरकारी आदेश त्याला मिळाल्याने त्याला ने ताबडतोब नाशिकला येऊन त्यांचा चार्ज घ्यावा लागल्याकारणाने त्याला आपल्या गावीही जाता आले नाही. आपण आपल्या स्वबळावर कमविलेल्या पैशातून सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन परस्पर सोडवून शेतीची गहाण ठेवलेली कागदपत्रे वडिलांच्या चरणी ठेवून त्यांना सुखद धक्का देऊ, असे त्याने ठरवून टाकले.

नाशिकचा कलेक्टर पदभार सांभाळून त्याला एक वर्ष झाले होते. या काळात संजूने सावकारांचे सर्व कर्ज चुकते करून गहाण ठेवलेल्या जमिनीचे कागदपत्रे हस्तगत केले होते. आबांनी घेतलेले बँकेचे कर्जही त्याने फेडले. संजू आता कलेक्टर झाल्याने त्याच्या दिमतीला लाल दिव्याची गाडी होती व एक पोलिसाची जीप सदैव त्याच्या सेवेला हजर होती.

रविवार सकाळी संजू आपल्या लाल दिव्याच्या गाडीतून आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. नेहमीप्रमाणे पोलिसांची जीप त्यांच्या गाडीपुढे धाव होती. संजूच्या एका हातामध्ये आपल्या शेतजमिनीची कागदपत्रे होती व दुसऱ्या हातात मिठाईचा बॉक्स होता. आबांच्या हातावर जमिनीची कागदपत्रे ठेवून त्यांच्या तोंडात मिठाई भरून त्यांनी घेतलेल्या शपथेतून त्यांची आज मुक्तता करणार होता. गाडीने शेनवड गावचे शिवार ओलांडताच रस्त्याला लागूनच असलेली त्यांची शेतजमीन त्याच्या नजरेस पडली. पाहतो तर काय? सगळा गावच त्यांच्या शेतात गोळा झालेला होता. हे पाहताच संजूने आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबविण्यास सांगितले व गाडी थांबताच धावतच गर्दीतून वाट काढत पुढे येऊन पाहतो तर त्याला जबर धक्काच बसला.

समोरचे दृश्य इतके भयवाह होते की, ते पाहताच संजूचे सर्व शरीर थरथरू लागले. शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडावर दोराने फाशी घेतलेल्या रामजीचा मृतदेह लटकत होता. हे पाहताच संजूने हंबरडा फोडला व हृदय पिळवटून टाकणारे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. “आबा, तुम्ही थांबायला हवे होते”

- सलीम रंगरेज

अभिप्राय

माझा बाप्पा
माझा बाप्पा (मातीतून घडविलेल्या आपल्या पर्यावरणपूरक बाप्पाची छायाचित्रे)
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,5,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1366,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,6,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1105,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,2,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,251,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,65,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री शिंदे-कांबळे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,35,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,38,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,9,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,20,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1147,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,29,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,287,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,8,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा)
आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा)
आबा, तुम्ही थांबायला हवे होते (मराठी कथा) - सावकाराकडे गहाण ठेवलेल्या जमीनीची सोडवणुक करू पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या कलेक्टर मुलाची कथा.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijktJdSRCHfaYfyeU7drU0AOc4XhqzF2REb8gH3-8LUPnkoBcfYKqb4EN6cOLNF2ouL_K-2Dky60XavGoRQ9W7aUNdUSg3YqMAfK41tP891nWmzBkyhH7fUPs5GuFPyV6BBIZnNVXBQ-BkE5lp6iji8NXLppQnnQAE2T40sndHfjmAqAzlzu8Ag9CbJg/s1600-rw/aaba-tumhi-thambayala-have-hote-marathi-katha.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijktJdSRCHfaYfyeU7drU0AOc4XhqzF2REb8gH3-8LUPnkoBcfYKqb4EN6cOLNF2ouL_K-2Dky60XavGoRQ9W7aUNdUSg3YqMAfK41tP891nWmzBkyhH7fUPs5GuFPyV6BBIZnNVXBQ-BkE5lp6iji8NXLppQnnQAE2T40sndHfjmAqAzlzu8Ag9CbJg/s72-c-rw/aaba-tumhi-thambayala-have-hote-marathi-katha.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/01/aaba-tumhi-thambayala-have-hote-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/01/aaba-tumhi-thambayala-have-hote-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची