छोट्याछोट्या गोष्टी - मराठी कविता

छोट्याछोट्या गोष्टी, मराठी कविता - [Chotyachotya Goshti, Marathi Kavita] छोट्याछोट्या गोष्टी, मोठमोठाले स्वप्न.
छोट्याछोट्या गोष्टी - मराठी कविता | Chotyachotya Goshti - Marathi Kavita

छोट्याछोट्या गोष्टी, मोठमोठाले स्वप्न

छोट्याछोट्या गोष्टी
मोठमोठाले स्वप्न

दोन जीवांचा मेळ
आठवते ती टपरी वरची भेळ

कधी केलेल्या त्या चोरूनचोरून गप्पा
अशा संकटात सापडलो की आठवतो बाप्पा

आठवली कधी हातावरची टाळी
तर रडण्याचीच येते पाळी

दंगलेले जीव रंगलेली कहाणी
एकमेकांच्या आयुष्यात जाऊन
करतात ती पहिली बोहनी

-प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.