कधी रडवतो, कधी हसवतो
असा कसा आहेस रे तू
कधी रडवतो, कधी हसवतो
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
तूच मला आठवतोस
कधी गेली सोडून तुला
तू आठवशील का रे मला
असा प्रश्न छळतो ना तुला
किती ही म्हणलो तरी
आपली मैत्री होती बरी
आठवणींचीच ती साखळी होती खरी
उदास बसले की
तुझी आठवण येते
दिवस रात्र स्वप्नामध्ये
मी तुलाच का पहाते
आई बाबा संगे खूप केले सण
आता वाटते मला पण तुझ्यासाठी काय पण
-प्रिती चव्हाण