तुझ्या रुपात पत्नी - मराठी कविता

तुझ्या रुपात पत्नी, मराठी कविता - [Tujhya Rupat Patni, Marathi Kavita] तू दिसलीस तेव्हा, मी तुला दूर वरून पहात होतो.
तुझ्या रुपात पत्नी - मराठी कविता | Tujhya Rupat Patni - Marathi Kavita

तू दिसलीस तेव्हा, मी तुला दूर वरून पहात होतो

तू दिसलीस तेव्हा
मी तुला दूर वरून पहात होतो

तू देवळाची पहिली पायरी चढली
तेव्हा मागवा मी घेत होतो

तू नतमस्तक होऊन
देवाकडे काहीतरी मागत होती

तेव्हा केवळ तुझ्या ओठांची
चुळबुळ मी पहात होतो

देवाभोवती प्रदक्षिणा
जेव्हा तू घालत होती

तेव्हा होमाभोवतीचे ते सात फेरे
मी नजरे समोर पहात होतो

तुला माहितीय, देवाकडे दिवसेंदिवस
मी तुझ्या रुपात पत्नी मागत होतो

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.