वाटले नव्हते कधी - मराठी कविता

वाटले नव्हते कधी, मराठी कविता - [Vatale Navhate, Kadhi Marathi Kavita] वाटले नव्हते कधी, या चक्रीवादळात, तू मला सोडून जाईल.
वाटले नव्हते कधी - मराठी कविता | Vatale Navhate - Kadhi Marathi Kavita

वाटले नव्हते कधी, या चक्रीवादळात, तू मला सोडून जाईल

वाटले नव्हते कधी
या चक्रीवादळात
तू मला सोडून जाईल

त्या वाहत्या वावधानात
अंधुक अंधुक प्रकाशात
मी तुला पाहिलं

कधी त्या आठवणीचे अश्रू आले
तर नजरेतील कचरा समजून
वेळ काढून नेईल

आता या अकालीन रस्त्यावर
तुझ्या सारखी साथ
मला कोण देईल

संकट आली की
कविता मी लिहील
पण
नेहमी वाटेल की
तूच धावून येईल

शेवटी एकच सांगेल
मी हीच अशा राहील
की तू पुन्हा येईल

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.