Loading ...

सोपानदेव चौधरी

सोपानदेव चौधरी - [Sopandev Chaudhari] सोपानदेव चौधरी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते.

सोपानदेव चौधरी | Sopandev Chaudhari

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी


सोपानदेव चौधरी

(१६ ऑक्टोबर १९०७ - ४ ऑक्टोबर १९८८) सोपानदेव चौधरी / सोपानदेव नथुजी चौधरी हे ज्येष्ठ कवयित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते.



स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे..


स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे..

जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे!

दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे!

नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे!

- सोपानदेव चौधरी


आली कुठूनशी कानी


आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन

नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात

- सोपानदेव चौधरी


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची