महाराष्ट्र असे महान (मराठी कविता)

महाराष्ट्र असे महान,मराठी कविता - [Maharashtra Ase Mahan,Marathi Kavita] राज्यामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान,या महान राष्ट्राचे गातो गुणगान.
महाराष्ट्र असे महान - मराठी कविता | Maharashtra Ase Mahan - Marathi Kavita
महाराष्ट्र असे महान (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
राज्यामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान.

राज्यामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान या महान राष्ट्राचे आम्ही गातो गुणगान फुले, टिळक, आगरकर इथे जन्मले लाल स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगिले किती हाल गिरिवरती सुंदर लेणी, मंदिरे कृष्ण पाषाणी तुकयाची अभंगवाणी, लतादिदींची मंजुळ गाणी आनंदीबाई जोशी पहिल्या महिल्या डॉक्टर कृष्णा पाटीलने केले शिखर एव्हरेस्ट सर भीमा, कृष्णा, गोदावरी अन्‌ उत्तुंग सह्यगिरी या राज्याची राजधानी माझी मुंबई नगरी डफाच्या थापेवरती गर्जे शिवबाचा पोवाडा जाखडी अन्‌ लावणीने सारा देश झाला वेडा

- ऋग्वेदा विश्वासराव.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.