मार्तंडाष्टक - खंडोबाची आरती

मार्तंडाष्टक, खंडोबाची आरती - [Martandashtak, Khandobachi Aarti] त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही.
मार्तंडाष्टक - खंडोबाची आरती | Martandashtak - Khandobachi Aarti

त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही


मार्तंडाष्टक - (खंडोबाची आरती).त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही ।
त्याही ब्राह्मण यज्ञहोम हवने विध्वंसिली सर्वही ॥
आला ते समयीं सदाशिवस्वये सोडोनि ब्रह्मांड हो ।
तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो ॥१॥

संगे घेऊनि सप्तकोटि गण हे आला असे भूतला ।
खंडेराव म्हणोनिया अवगला शरत्वतेची लिला ॥
सक्रोधे मणिमल्ल मर्दुनि तया केला पहा दंड हो ।
तो हा पाहु चला ॥२॥

संतोषे गन सर्वदा उथळिती भंडार देवावरी ।
झालासे विजयी म्हणोनि दिवट्या लावोनिया पेंबरी ॥
केला वास शिवे तळ्या उचलिल्या निर्दाळिले लंड हो ।
तो हा पाहु चला ॥२॥

घेता हा अवतार दुष्ट दमुनी सद्भक्त संरक्षिले ।
गाई ब्राह्मण यज्ञयाग सगळे हे धर्म संस्थापिले ॥
गाती भक्त, ऋशि, गण सदा सत्कीर्ति उदंड हो ।
तो हा पाहु चला ॥४॥

प्रारंभी स्थल पेंबरी, तदुपरी पालीस आला असे ।
निमगावी तिसरे विशेष चवथे हे जेजुरीचे दिसे ॥
ऐशी योजुनि स्थानके विचर्तो नौखंड पृथ्वीत हो ।
तो हा पाहु चला ॥५॥

शोभे दिव्यकळा सुरंग पिवळा आपादपर्यंत हो ।
घाले लोचन पाहता मुखशशी तो हा म्हाळसाकांत हो ॥
अश्वारूढ- करी सळंब झळके ते शस्त्र आखंड हो ।
तो हा पाहु चला ॥६॥

ऐशा या कुलदेवतास नमुनी जो नित्य भावे भजे ।
त्याला काय उणे? न मागत तरी अप्राप्त तेही दिजे ॥
दाता देईल भुक्तिमुक्ति समुळी वारूनि पाखंड हो ।
तो हा पाहु चला ॥७॥

मार्तंडाष्टक जो पठेल अथवा ऐकेल अत्यादरे ।
त्याचे हा कळिकाळ दास्य करुनि राहील हो हे करे ॥
तेतेह शाश्वत रंगला निजसुखे नासूनिया बंड हो ।
तो हा पाहु चला ॥८॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.