भरकटलेल्या आयुष्याला लाभलेल्या प्रवासात, कर्तव्याचा धागा मला तोडावासा वाटतो
भरकटलेल्या आयुष्याला लाभलेल्या प्रवासात
कर्तव्याचा धागा मला तोडावासा वाटतो
फक्त श्वास घेण्याला जीवन जेव्हा म्हणतात
तेव्हा मला श्वास सोडावासा वाटतो
कितीतरी इच्छांची चिता जळत रहाते
तळमळणाऱ्या मनाची तहान कुठे भागते
संयमाचा पुतळा मला फोडावासा वाटतो
तेव्हा मला श्वास सोडावासा वाटतो
धर्माच्या बाजारात देवाची विक्री
रामाच्या आचारात रावणाची बेफिक्री
बरोबर का चूक हा हिशोब जोडावासा वाटतो
तेव्हा मला श्वास सोडावासा वाटतो
मन ठेवा तिजोरीत जगा सारखे वागा
नम्र पणे हाल सोसा करू नका त्रागा
हा दृष्ट नियम जगाचा मोडावासा वाटतो
तेव्हा मला श्वास सोडावासा वाटतो
- समर्पण