प्लास्टिक आणि आपली मुंबई - मराठी कविता

प्लास्टिक आणि आपली मुंबई,मराठी कविता - [Plastic Apali Mumbai,Marathi Kavita] नका नका प्लास्टिक वापरू, अगं माये अरे भाऊ.
प्लास्टिक आणि आपली मुंबई - मराठी कविता | Plastic Apali Mumbai - Marathi Kavita

नका नका प्लास्टिक वापरू, अगं माये अरे भाऊ

नका नका प्लास्टिक वापरू, अगं माये अरे भाऊ
पिशवीमंदी कचरा भरून नको फेकून तू देवू

गुरंढोरं कचरा खाती, प्लास्टिक पोटा मंदी जाई
चारा नाही त्यांच्या पोटी, प्लास्टिकचा गोळा होई

प्लास्टिक होत जिथं गोळा पाण्या नाही देत वाट
धरित्री ना घेई पोटी, खत नाही पीक भेट

समिंदरा प्लास्टिक जाता तरास होतो जलचरा
मासे, प्राणी मुकं जीव त्यांचा विचार करा जरा

प्लास्टिकला तू दूर कर, मनापासनं दे नकार
तुझ्याकडे शहाणपण ठेवू नको तू गहाण

वापर तू कागद कापड आपलसं त्यास म्हण
देवा दिले तुले मग तेचा कर तू सन्मान

मुंबई नगरी आपली माय तिला ठेवू सांभाळून
प्रत्येकानं ठरवू मनी प्लास्टिकला नाही म्हणून


प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure
बंगळूर, कर्नाटक (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बिझीनेस मॅनेजमेंट विषयात पदविधर असलेल्या प्रज्ञा यांना लहान मुंलांविषयीच्या लेखनात रस आहे त्यावर त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.