Loading ...

स्त्री होऊनी बघ - मराठी कविता (मंजुषा कुलकर्णी)

स्त्री होऊनी बघ,मराठी कविता - [Stree Houni Bagh,Marathi Kavita] आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने डॉ. मंजूषा कुलकर्णी यांची मराठी कविता.

स्त्री होऊनी बघ - मराठी कविता (मंजुषा कुलकर्णी)

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने डॉ. मंजूषा कुलकर्णी यांची मराठी कविता...


स्त्री होऊनी बघ - मराठी कविता (मंजुषा कुलकर्णी)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री ‘मंजुषा कुलकर्णी’ यांची ‘स्त्री होऊनी बघ’ ही मराठी कविता.



स्त्री होऊनी बघ

मंजुषा कुलकर्णी


एकदा स्त्री होऊनी बघ ईश्वराची ती कला ती अशी अनुपम कृती जी जननी होते सकला ती गुणांची खाण मोठी दडली रत्ने अगणित प्रेम निस्सीम ते तिचे पारख तिजला सहजीच आई ती, दे जन्म तनुला पोसते निज पायसे ती असे जर जवळी आपुल्या देवही संगत असे तिच भगिनी तिच सखीही तिच नाती पारखी तिच नांदे प्रेमवत्सल तिच प्रेरक सारखी त्या तिच्या प्रेमास नाही तोड जगती कोणती सारे सारे निभवूनीही श्रेय ना तिज, कोण ती? ती आहे तर काळजीचे नाही कारण कोणते ती आहे तर प्रेम नित्य कोण तिजला जाणते? स्फूर्ती ती वात्सल्यमूर्ती तिच साथ नि संगती तिच शक्ती तिच भक्ती युक्ती मुक्ती तिच ती काय हवे तिज प्रेम केवळ स्नेहवश असते सदा आदराची भूक तिजला सन्मानाची संपदा जीवनाला रंग देते जीवनाचे अंग ती जीवनाच्या संगी असता जीवनी आनंद ती ती कुणी ना देहधारी तत्त्व असते स्त्री पुन्हा प्रकृती ती संस्कृती ती मंत्र माया ती पुन्हा दुर्दम्य इच्छा, विमल स्वच्छा पारदर्शी दर्पण तिच त्यागी, अनुरागी तिच तेज, समर्पण मार्ग दावी ती सुयोग्य तिच सुंदर शांभवी तिच धनदा तीच वरदा ज्ञानदा ती जान्हवी त्राण आहे तिच सारे प्राण असते ती खरी आण आहे मान आहे जाण पाहे तिज खरी ती आहे तर घर आहे मंदिरातही तिच ती ती आहे तर सुख आहे यश कीर्ती तिच ती स्वामिनी ती दामिनी ती यामिनी मनभाविनी मोहिनी ती रागिणी ती मानिनी अनभाविनी दे तिला प्रेमळ शब्द प्रेम निखळही तेवढे मन होऊ दे विशाल असते तिचे ते जेवढे ऋण तिचे ना न्यून होते जन्मोजन्मी राहते तिच भोवती अन सभोवती तिच प्रेमे पाहते त्या तिच्या ऋणबंधनातच राहू आपण नित्यही ते तिला सुख देऊ सारे तत्त्व स्त्री हे सत्यही


मंजुषा कुलकर्णी यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची