जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने पुरुषांसाठी एक सप्तपदी
महिला दिवस म्हणजे काही एक दिवसाचा उत्सव नाही की तो दिवस साजरा करा आणि ईतर दिवशी तिला उपेक्षित ठेवा.हा टेंपररी बदल नाही हे विचारांचे परिवर्तन आहे! परिपूर्णतेसाठी हा बदल स्त्री आणि पुरुष दोघांनाही आवश्यक! कारण आई, बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण, कलिग या प्रत्येक रुपात तुमची गाठ तीच्याशीच! ती सक्षम तरच पुढची पिढी सक्षम! समाज सक्षम!
म्हणूनच एक सप्तपदी पुरुषांनाही!
१) स - समानतेचा:
स्त्री एक व्यक्ती म्हणून समान आहे हे लक्षात असुदे. तिची स्वतःची अशी काही स्वप्न आहेत, गरजा आहेत.
२) स - सहकाराचा:
घर - संसार काही तिचे एकटीचे नाही. आयुष्यातल्या प्रत्येक पावलांवर तुमचं सहकार्य तिला हवं आहे.
३) स - सहजीवनाचा:
एकमेकांना तुल्यबळ नको, तुलना तर नकोच, पूरक आणि परिपूर्ण, परिपक्व असावं.
४) स - सामंजस्याचा:
स्त्री म्हणून तीचे अंतरंग, अडचणी, भय, ईच्छा समजून घ्या.
५) स - संवादाचा:
हवा मनमोकळा संवाद, तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. आपल्या मनातले विचार तिला सांगा.
६) स - संवेदनशीलतेचा:
तिच्या भावनिक, शारिरीक, मानसिक संघर्षांबद्दल, प्रश्नांबद्दल संवेदनशील व्हा.
७) स - सद्विचार सद्भावनेचा:
तिच्या बद्दल मनात आपुलकी, प्रेम, ममता, आदर असुदेत. निव्वळ वासना नको.
माझ्या सर्व मित्रांना जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा!