“सप्तपदी” सक्षमीकरणाची!

सप्तपदी सक्षमीकरणाची - [Saptapadi Sabalikaranachi] सक्षमीकरणासाठीची सप्तपदी, जी तीनं एकटीनेच चालायची आहे.
सप्तपदी सक्षमीकरणाची - Saptapadi Sabalikaranachi

सक्षमीकरणासाठीची सप्तपदी, जी तीनं एकटीनेच चालायची आहे

स्त्री कधीच अबला नसते. पुष्कळदा परिस्थिती आणि माणसे तिला असहाय्य बनवतात. पण मनात आणलं तर परिस्थिती बदलण्याची क्षमता आणि जिद्द तिच्यात पहिल्यापासूनच असते. गरज असते ती स्वतःची क्षमता ओळखायची आणि स्वतःला सिध्द करण्याची.

सक्षमतेचा मार्ग खडतर असला तरी अशक्य किंवा अप्राप्य नक्कीच नाही पण त्या करता स्त्रीने स्वतःमधे बदल करणं आवश्यक आहे. या सक्षमीकरणासाठीची सप्तपदी, ही मात्र तीनं एकटीनेच चालायची आहे.

“सप्तपदी” सक्षमीकरणाची!


१) स्वतःचा शोध:
स्वतःच्या क्षमता ओळखा, जाणुन घ्या स्वतःला. स्वतःचा SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) करा. आपली बलस्थाने ओळखा.

२) संपूर्ण स्विकार:
स्वतःचा स्विकार, self acceptance. मी जशी आहे तशी स्वतःला स्विकारणं. स्वतःच्या गुणदोषांसकट.

३) स्वप्न बघा आणि सक्रिय व्हा:
स्वतःचं, एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून स्वप्न बाळगा. केवळ स्वप्न बघून चालणार नाही ती पूर्ण करायला क्रियाशील व्हावं लागेल.

४) स्वावलंबी व्हा:
आत्मनिर्भर व्हायचं असेल तर प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण होणं महत्त्वाचं. शारिरीक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिका.

५) सकारात्मक व्हा:
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वतःकडे, इतरांकडे आणि परिस्थितीकडे बघण्याचा.

६) स्वार्थी व्हा:
स्वतःची काळजी घ्या. मनाची आणि शरिराचीही. स्वतःकरताही थोडा वेळ द्या.

७) सुखाचा शोध:
स्वतःच्या सुखाची जबाबदारी स्वतः घ्या. नवरा, मुलं, मित्रमैत्रीणी तुम्हाला सुखी ठेवायला बांधिल नाहीत. आपल्या आनंदाची कारणे शोधा.

स्वतः सक्षम व्हा आणि आपल्या बरोबर इतरांनाही सक्षम करा!

Happy Women's Day!
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.