साथिया भाग ४ (गुंतता ऋदय हे) - मराठी कथा

साथिया भाग ४,मराठी कथा - [Sathitya Part 4,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.
साथिया भाग ४ - मराठी कथा | Sathiya Part 4 - Marathi Katha

सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा


गुंतता ऋदय हे!
२०१३ - कोल्हापूर

एखादी घटना घडते आणि आपलं सर्व आयुष्य बदलून टाकते. दहा वर्षांपूर्वी अशाच एका घटनेने, वैदेही विश्वजीतच्या जिवनात आली होती आणि त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. आज इतक्या वर्षांनी, एका वादळी रात्रीच्या घटनेमुळे, विश्वजीत च्या भावविश्वात संपूर्ण उलथापालथ झाली होती.

सकाळ झाली, आकाश निरभ्र झालं होतं. उन्ह डोळ्यावर आली तशी विश्वजीतला जाग आली. पुन्हा एकदा रात्रीचे उत्कट क्षण डोळ्यासमोर आले. शरिर आणि आत्म्याच्या मिलनाचा आनंद काही अद्भुत असतो... पूर्णसुखाची अनुभूती देणारा... त्या आठवणींतून बाहेर पडावसं वाटत नव्हतं त्याला! तो याच स्वप्नरंजनात गुंतला असता पण त्याला लक्षात आलं की वैदेही कधीच निघून गेलेली आहे. ती वाड्यात असेल या विचारांनी तो पटकन कपडे घालून वाड्यावर आला पण वैदेही पहाटेच पुण्याला निघून गेली होती. विश्वजीतचं मन खट्टू झालं. त्याला माहित होतं की वैदेही करता हा धक्का पचवणं सोपं नव्हतं. ती अत्यंत रुढीप्रिय संस्कारात वाढलेली मुलगी होती. पण तो तीला प्रेमाने समजवणार होता. तिच्या मनातली कील्मिष दूर करणार होता. तिचं मन वळवण्यासाठी कितीही दिवस थांबायला तो तयार होता.

पुण्यात ऑफीसमधे विश्वजीत परत आला त्यावेळी वैदेहीच्या वागण्यातला फरक लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. ती काम करत होती पण त्याच्या बरोबर संवाद टाळत होती. त्याच्या समोर येण्याचं टाळत होती. एकत्र मिटींगला त्याच्या गाडीतून जायचं टाळत होती. त्याच्या नजरेला नजर देखील देऊ शकत नव्हती.

फोनवर माफकच बोलत होती. त्याचा पुसटता स्पर्श देखील टाळत होती. ज्या उत्कट क्षणांनी विश्वजीतला आनंदी आणि उल्हासित बनवलं होतं त्याने वैदेही मात्र एखाद्या निर्जीव पुतळी सारखी झाली होती.

ती रागावली असती, चिडली असती, भांडली असती तरी त्याने समजून घेतलं असतं. पण तीचा हा अबोला आणि यांत्रिक वागणं त्याला सहन होतं नव्हतं. जेमतेम दहा पंधरा दिवस त्याने वाट बघितली. शेवटी त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला.

त्यांच्या टिमची stratagy मीटिंग झाल्यावर बाकीची टिम केबिन बाहेर पडली. उशीर झाला होता. ऐकेक टिम मेंबर घरी जात होता. विश्वजीतने वैदेहीला केबिनमधे बोलावून घेतलं.

“बस, मला बोलायचं आहे तुझ्याशी. वैदेही न बसता खाली मान घालून नुसतीच उभी राहिली आहे हे बघून त्याने पुढे बोलायला सुरवात केली. वैदेही, कोल्हापूरला शेतावर जे झालं...

“होय! माझ्या हातून अक्षम्य चुक झाली आहे विश्वजीत, मला क्षमा करा...! त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देताच वैदेही उद्गारली.

“चूक??! हे तू काय बोलतेस वैदेही?! आपण काहिही चुक केली नाही. जे घडलंय ते अतिशय उत्कट आणि नैसर्गिक होतं वैदेही. I have no regrets, मी अतिशय आनंदी आहे.” विश्वजीत तिला समजावत म्हणाला.

“विश्वजीत, नैसर्गिक भावना तुमच्या दृष्टीने योग्य वाटत असेल कदाचित! तुम्ही तरुण आहात. पण माझा तोल गेला. मी स्वतःला आवरु शकले नाही. मी वयाने मोठी आहे. मला समजायला हवं होतं. वैदेहीच्या चेहर्‍यावर वेदना आणि स्वतःबद्दलचा तिरस्कार दिसत होता.

“तु स्वतःला कोण समजतेस?! वयोवृद्ध आजी?? वैदेही, तुझी चाळीशी पण झालेली नाही. तु माझ्यापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी आहेस. For God sake, तु एक तरुण स्त्री आहेस हे का लक्षात घेत नाहिएस? You have needs! यात लाज वाटण्याचा प्रश्न कुठे येतो वैदेही??” विश्वजीत आता वैतागला होता.

“विश्वजीत तुम्ही एक विवाहित पुरुष आहात आणि मी एक विवाहित स्त्री आहे आणि जे काही झालं त्याला समाजाच्या भाषेत adultary - व्यभिचार म्हणतात विश्वजीत! आणि तो आपल्या हातून घडलाय...” वैवैदेही संतापून म्हणाली.

त्याच्या पवित्र आणि उत्कट भावनेला, व्यभिचार म्हणून एवढं हिन पातळीला नेणं, विश्वजीतच्या जिव्हारी लागलं.

“Oh!! For god sake, you are not married any more! अनिरुद्ध गेलाय चार वर्षांपूर्वी वैदेही, just accept the fact! विश्वजीतचा आवाज वाढला होता. आज पहिल्यांदाच त्याला अनिरुद्धचा प्रचंड हेवा वाटत होता... कारण त्याची वैदेही अनिरुद्धला विसरायलाच तयार नव्हती.

...आणि व्यभिचार तेव्हा म्हणतात ज्या वेळेस शरिराची आणि मनाची विसंगती असते. जे झालं ते अविस्मरणीय होतं. उत्कट होतं, मला हवंहवसं होतं! And it happened because I love you Vaidehi!

“विश्वजीत enough! केवळ एक शारिरीक जवळीक झाली म्हणून एका क्षणात कोणी जन्मजन्मांतरीच्या नात्यात आणि प्रेमात अडकत नाही. माझ्यावर प्रेम आहे हा केवळ तुमचा समज आहे. शुध्द फसवणूक! जागे व्हा आणि स्वप्नातून बाहेर पडा!!”

“का?? तुझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठा असलेला अनिरुद्ध तुझ्या प्रेमात एका क्षणात पडू शकतो हे तुला मान्य आहे?!”

“ती फुलराणी मधली फुलराणी, प्रोफेसरच्या प्रेमात पडलेली तुला आवडते, उमजते, पण मी तुझ्या प्रेमात पडलोय हे उमजत नाही???? I really love you. Only you can make me complete. फक्त तुच मला सुखी करु शकतेस वैदेही.”

“Just stop it विश्वजीत!” वैदेही ने चेहरा झाकून घेतला.

असं काही नाहीए. तुम्ही देवयानीचे पती आहात. सर्वार्थाने ती तुमची पत्नी आहे. दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करणं पण चुकीचं आहे.
“पण देवयानीवर माझं प्रेम नाहीए वैदेही! मी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे तिच्याशी लग्न केलं पण आमचे कधीच सूर जुळले नाहीत गं! फक्त देवा ब्राम्हणांच्या समक्ष गळ्यात माळ घातली म्हणजे जिवनसाथी होता येत का?? तु मला जेवढं समजून घेऊ शकतेस ते देवयानी ला स्वप्नात तरी शक्य आहे का? आणि तुला एवढाच प्रॉब्लेम असेल तर मी तीला घटस्फोट द्यायला तयार आहे.”

“विश्वजीत! तुम्ही असं काहीही करणार नाहीयात! तुमची राजकीय कारकीर्द गाळात जाईल. तुमच्या बद्दल कुठलिही controversy होता कामा नये. तुमच्या इमेजला कधिही तडा जाता कामा नये.”

“जे झालं ते विसरुन जा. डीलीट करुन टाका. मला आता यापुढे काहिही बोलायचं कींवा ऐकायचं नाहीए.. वैदेही शेवटचं बोलून निघाली.”

“तुला आज ऐकावचं लागेल वैदेही, तिला थांबवत विश्वजीत उद्वेगाने म्हणाला. आत्तापर्यंत तू जे जे सांगितलंस ते मी ऐकत आलोय!...”
तु म्हणालीस दारु, सिगारेट सोड... मी सोडली.
तु म्हणालीस... जात धर्म विसरुन जा, मी विसरलो!
तु म्हणालीस म्हणून, मजा, मस्ती, मित्रांची संगत सोडली...
तु जे जे म्हणालीस ते मी करत आलो...

पण मी माणूस आहे, एक पुरुष आहे हे कसं विसरु मी?? माझं प्रेम, माझ्या ईच्छा, माझ्या भावना कश्या सोडून देऊ? I have every right to be happy and so have you!

तुला स्पर्श केल्यावर मी देवयानी कडे कसा परत जाऊ?? एकदा विजेला कवटाळल्यानंतर ...काजव्याबरोबर संग नाही करता येत! You have made me useless for any other women वैदेही!

मी काहीही अयोग्य केलेलं नाही. तुझ्या सहवासात घालवलेल्या प्रत्येक क्षणांबद्दल मी ऋणी आहे, आनंदी आहे. मी सत्य स्विकारलं आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि कायम राहील. समाजाला मान्य असो वा नसो तु मला हवी आहेस.

तू तुझ्या मनाला विचार, Don't you feel anything for me?

तू सत्य स्विकारायला घाबरतेस वैदेही... की त्या रात्री तु देखील माझ्या इतकीच involved होतीस, आनंदी होतीस???!

तु का कबूल करत नाहीस... that you felt same passion and feelings for me!???
“विश्वजीत प्लिज stop it!” वैदेहीने कानावर हात ठेवले.
पण आता विश्वजीत बोलणं थांबवायला तयार नव्हता...

“तुला गिल्टी वाटतयं कारण, तेव्हा, त्या क्षणी तु अनिरुद्धला पूर्णपणे विसरली होतीस वैदेही! Just accept the fact that I made you forget him… Just accept that you too love me!!”

“विश्वजीत!! Just stop it!” वैदेही ओरडली, आणि अंगात होती नव्हती ती ताकद एकवटून वैदेही ने विश्वजीत च्या थोबाडीत मारली... इतका वेळ कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला, रडत ती केबिनच्या बाहेर पडली... ती कायमचीच!

सोमवारी त्याच्या टेबलावर, वैदेहीचा फक्त चार ओळींचा राजीनामा आला. एका पाकीटात, तिच्या टिम करता, पुढच्या कामांचं नियमन आणि यादी लिहुन ठेवायला ती विसरली नव्हती. शेजारच्यांच्या म्हणण्यानुसार, वैदेही शनिवारीच अमेरिकेत निघून गेली होती.

आता एकच आशा होती, अबोली! पण तिला तो काय सांगणार होता? कुठल्या तोंडाने, जे घडलाय ते ऐकवणार होता?? विश्वजीतची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी अबोलीचाच फोन त्याला आला.

“विश्वजीत दादा! आईचं आणि तुझं काही भांडण झालंय का रे?? ती मला भेटायला आलेय पण माझ्याशी धड बोलत पण नाहीए. एकटक कुठेतरी बघत बसते. मधूनच रडते, धड खातपीत नाही. काय होतयं विचारलं तर काही सांगत नाही! Is she all right?

अबोलीचं बोलणं ऐकून विश्वजीत अस्वस्थ झाला. वैदेहीचा हट्टी, मनस्वी स्वभाव त्याला माहीत होता. शक्य असतं तर अमेरिकेत जाऊन तिला उचलून परत आणायला सुध्दा त्याने कमी केलं नसतं. पण ते एवढं सोपं नव्हतं. तिच्या मनाविरुद्ध काहीही करणं त्याला शक्य नव्हतं. त्याने अजून काही दिवस वाट बघायची ठरवली आणि तो परत एकदा कामाला लागला.

निवडणूक तोंडावर आली होती. त्याची टिम रात्रंदिवस राबत होती. समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी होता, पण पुन्हा एकदा जनतेने त्याच्या बाजूने कौल दिला होता. २०१४ मधे पुन्हा एकदा सर्वाधिक मताधिक्याने तो विजयी झाला होता. आज त्याला दादासाहेबांची आणि वैदेहीची आठवण येत होती. त्यांची कमी बोचत होती. त्याच्या पहिल्या विजयाच्या वेळी दोघेही त्यांच्या बरोबर उभे होते.

विश्वजीतने अधीर होऊन अमेरिकेत फोन फीरवला. वैदेहीचा मानलेला भाऊ प्रकाश फोनवर आला. प्रकाश दादा! मला वैदेहीशी बोलायचं आहे. तिला इलेक्शनची बातमी सांगायची आहे!

“अरेऽऽऽ वा, great विश्वजीत! Congratulations! मला पण तुला एक छान बातमी सांगायची आहे! प्रकाश उत्साहात म्हणाला... वैदेही लग्न करतेय! She is getting married this month!”

“काय??? विश्वजीतला कोणीतरी कानात अ‍ॅसीड ओततयं असं वाटायला लागलं. कोण? कधी?... त्याच्या तोंडून जेमतेम शब्द बाहेर पडले. अरे तीचाच वर्गमित्र आहे. डॉक्टर आहे; तो ही विधूर आहे.

विश्वजीतला आठवलं काही वर्षांपूर्वी अनिरुद्ध गेल्यावर हा डॉक्टरमीत्र वैदेहीला भेटायला आवर्जून आला होता. विश्वजीत त्याला तीच्याच घरी भेटला होता! त्यापुढे प्रकाशचं बोलणं त्याच्या कानात शिरलं सुध्दा नाही.

आता सगळी आशा संपली होती. वैदेहीने सगळे दरवाजे बंद करून टाकले होते. त्याच्या आयुष्यातून ती आता कायमची बाद झाली होती! त्याच्या टेबलावर, त्याचा आणि वैदेहीचा, मागच्या इलेक्शनच्या विजयानंतर काढलेला एक प्रसन्न फोटो होता. विश्वजीतने एकवार त्या फोटोकडे बघितलं आणि त्वेषाने त्या फोटोच्या फाडून चिंध्या करुन टाकल्या.

केबिन बाहेर त्याची टिम सेलिब्रेशन करता त्याची वाट बघत होती; त्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिवादन स्विकारत... विजयी मुद्रेने... विश्वजीत राजे भोसले, त्यांच्या success rally मधे सामिल झाले.

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.