स्त्री! - मराठी कविता

स्त्री, मराठी कविता - [Stree, Marathi Kavita] आजुबाजुला वावरणाऱ्या सर्व बहुगुणी, यशस्वी आणि ग्रेट स्त्रीयांना समर्पित.
स्त्री! - मराठी कविता | Stree! - Marathi Kavita

आजुबाजुला वावरणाऱ्या सर्व बहुगुणी, यशस्वी आणि ग्रेट स्त्रीयांना समर्पित


माझ्या आजुबाजुला वावरणाऱ्या सर्व बहुगुणी, यशस्वी आणि ग्रेट स्त्रीयांना समर्पित!! Phinominal Women वाचली त्यावरून मला सुचलेली एक भारतीय स्त्रीची कविता! महिला दिनाच्या निमित्ताने!


दिसायला साधारणशी,
उंचीदेखील बेताचीच,
सौंदर्याच्या मोजमापातील,
काही नाही माझ्या पाशी
तरी खुप जणं मोहून जातात,
म्हणतात मला छानशी,
काय आवडलं माझ्या मधलं?
डोळ्यातली चमक,
का ओठांवरील हास्य?
सांगणं त्यांना कठीण आहे...
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥

मुलीचा प्रोजेक्ट मी
मेहनतीने करते,
तीच्या प्रत्येक स्पर्धेला
मी कायम हजर राहते,
PTA मिटींगला
पोटतिडकीने बोलते,
बाई म्हणतात मुलीला,
हुशार आहे तुझी आई!
ईतर जणी विचारतात
कसं तुला जमतं बाई???
सहजच हसुन मी
माझं वेळेचं गणित मांडते!
नोकरी-घर-संसाराचं
कोष्टक त्यांना सांगते!
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥

घरामधे पाहुण्यांची
ये-जा असते सतत,
आप्तेष्ट मित्रांचे
स्वागत करते हसतं!
दमत नाहीस का ग कधी?
मैत्रीणी विचारतात
सुन आमची कर्तृत्ववान
सासुबाई सांगतात,
खळखळून हसत मी
प्रशस्ती स्विकारते,
कामाच्या वाटणीचे कौशल्य
माझ्या मनातचं ठेवते
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥

मैत्रीणीच्या मदतीला
मी कायम तयार असते,
त्यांच्या सुख-दुखाःत
मी भागीदार होते,
अडीअडचणींना त्यांना,
प्रेमाने समजावते,
पिकनिक,पार्टी,गप्पांचा
फड सहज जमवते,
नवरा म्हणतो,
धमाल आहेस तु!
मी म्हणते, खरच
कमाल आहे मी!
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥

आँफीसच्या मिटींग्स
महत्वाची डीस्कशन्स,
प्रोजेक्ट ची प्रेझेंटेशनस्
स्टाफ चे ओरीएंटेशन,
कुठल्याही कामामधे,
लागते माझी गरज,
आवडते मलाही जेव्हा
लागतो माझ्या बुद्धीचा कस,
एखादा पॉब्लेम मी
चुटकी सरशी सोडवता,
बॉस म्हणतो महान आहेस!!
आत्मविश्वासाचं हासुन
मी मनोमन सुखावते,
स्वकष्टार्जित शिक्षणाला
मनापासून दुवा देते.
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥

कधीकधी येतात मात्र
ढग निराशेचे,
काहीतरी बिनसते,
निर्णय होतात चुकीचे,
दमून भागून एकटीच,
मी दोन अश्रू ढाळते,
तरी स्वतःच्या कर्तृत्वावर
शंका घेणं टाळते,
उद्या सगळं नीट होईल,
मी स्वतःलाच आश्वासते,
नव्या उमेदीने मी
कामाला लागते
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे ॥
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.