Loading ...

मराठमोळी स्त्री (मराठी कविता)

मराठमोळी स्त्री (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री साक्षी यादव यांची मराठमोळी स्त्री ही मराठी कविता.

मराठमोळी स्त्री (मराठी कविता)

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवाचे पूजन करणारी...


मराठमोळी स्त्री (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘साक्षी यादव’ यांची ‘मराठमोळी स्त्री’ ही मराठी कविता.



ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवाचे पूजन करणारी
दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढणारी
तुळशी वृंदावनला प्रदक्षिणा घालणारी
अंगणात सडा शिंपडून, केर काढणारी
घरची खरी लक्ष्मी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...

माथ्यावर गडद भाग्याचं कुंकू लावून
साडीचा पदर कंबरेला खोचून
दिवसभर स्वयंपाकघरात राबणारी
आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणारी
खरी अन्नपूर्णा दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...

कपाळावर चंद्रकोर लावून
भगवे वस्त्र परिधान करून
तुझ्या हातात ढोल
मनात राजेंचे बोल
खरी शिवकन्या दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...

घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून
हाती कर्तव्याचा वसा घेऊन
ज्ञानदायी माऊली तू घराबाहेर पडते
सर्व क्षेत्रात आपले कर्तव्य गाजवते
खरी सरस्वती दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...

सैन्यदलात देशसेवेसाठी भरती होतांना
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना
अन्याया विरुद्ध आवाज उठवतांना
हक्कांसाठी लढा देतांना
खरी मर्दानी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...

सणाला काठपदराची नऊवारी नेसते
पारंपारिक साजशृंगार करते
तुझ्या जोडीदाराची तू पाठराखीन
त्याच्या आयुष्यातली प्रेमाची मालकीण
खरी रुक्मिणी दिसते तू...
मराठमोळी स्त्री शोभते तू...


मराठमोळी स्त्री (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- साक्षी यादव

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची