ती आहे आई - मराठी कविता

ती आहे आई, मराठी कविता - [Tee Aahe Aai, Marathi Kavita] रोज रोज राबते ती बाई, फक्त तुझ्याच शिक्षणापाई.
ती आहे आई - मराठी कविता | Tee Aahe Aai - Marathi Kavita

रोज रोज राबते ती बाई, फक्त तुझ्याच शिक्षणापाई

रडू नकोस बाळा आहे तुझी आई
कामाची रे तिला किती आहे घाई
रोज रोज राबते ती बाई
फक्त तुझ्याच शिक्षणापाई

तुझ्या चुकांवर पांघरून घालणारी ती आई
तुझ्या कर्तव्याची ती रे गुनवाई
तिलाच का रे म्हणतात आई

कष्ट करणारी ती आई
तुला कधी कळेल रे तिची नवलाई
तिळतिळ रक्त सांडणारी ती आई
तिलाच का रे असते मायेची गहराई

स्पटीकाप्रमाणे निर्मळ रे ती आई
रागात दिसते ना रे अंबाई
तीच ना रे तुझी आई
तुझ्या हट्टाची ती पुर्वाई

चॉकलेट - बिस्कीट रोज रोज ना देई
मग नाही का रे ती तुझी आई
नको रे म्हणूस कनिष्ठ ती बाई
ईश्वराहूनी श्रेष्ठ आहे माऊली तुझी आई

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.