भिंती - मराठी कविता

भिंती, मराठी कविता - [Bhinti, Marathi Kavita] दोन दिसाची जिंदगी, नको बरबाद सारे.
भिंती - मराठी कविता | Bhinti - Marathi Kavita

दोन दिसाची जिंदगी, नको बरबाद सारे

दोन दिसाची जिंदगी
नको बरबाद सारे

भूत मनी संशयाचे
तात्काळ दूर करा रे

जीवनात प्रश्न अगणित
स्वार तयावर व्हा रे

झटकूनी सारा गंज
चमकून दाखवा रे

होतील सर्व सुगम
प्रयत्न सोडू नका रे

माणसाचा जन्म आपुला
माणूसकी नका सोडू रे

जात धर्माच्या भिंती
उगीच कशाला वाढवता रे?

- महेश बिऱ्हाडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.