देवबाप्पा असतात का? - मराठी कविता

देवबाप्पा असतात का?, मराठी कविता - [Devbappa Astat Ka?, Marathi Kavita] सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?,खर सांग आई मला ते तुला दिसतात का?.
देवबाप्पा असतात का? - मराठी कविता | Devbappa Astat Ka? - Marathi Kavita

सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?,खर सांग आई मला ते तुला दिसतात का?

सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
खर सांग आई मला ते तुला दिसतात का?

खर सांगा तुम्ही मला त्यांच्याकडे मागतात का?
माझ्यासाठी ते तुम्हाला वाट पहायला लावतात ना!
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?

आयुष्यातील पाहिलं पाउल टाकताना
ते मला तुमच्या कुशीत सोडतात का?
झोपताना तुमच्या रुपात तेच मला भेटतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?

बाबांच्या खांद्यावर खेळताना
तेच मला सावरतात का?
हळूहळू चालताना, छोट्या छोट्या पावलांनी
तेच मला झेलतात ना

चिऊ काऊ मध्ये ते मला दिसतात का?
रोज रोजचे चॉकलेट बिस्कीट तेच मला देतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?

हट्टाच्या गाडीला चाके त्यांचीच चालतात का?
रुळावरून घसरल्यावर तेच मला रागवतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?

आयुष्याच्या शेवटी तेच मला तुमच्याकडून
हिसकून घेतात का?
शेवटी ते तुम्हाला दुखच देतात ना
आता तरी खर सांग आई मला देवबाप्पा असतात का?

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.