बहिणीची आशा - मराठी कविता

बहिणीची आशा, मराठी कविता - [Bhahinichi Aasha, Marathi Kavita] आई देवाला साकडं घालशील का? एकतरी गाऱ्हाणं करशील ना.
बहिणीची आशा - मराठी कविता | Bhahinichi Aasha - Marathi Kavita

आई देवाला साकडं घालशील का? एकतरी गाऱ्हाणं करशील ना

आई देवाला साकडं घालशील का?
एकतरी गाऱ्हाणं करशील ना
त्याला तू एक सांगशील का?

माझ्यासाठी ताई मागशील ना
तिला हे जग दावशील का?

माझ्या राखीसाठी तिला आणशील ना
माझ्यासारखं तिला खेळावशील का?

जगण्याची आशा तीला लावशील ना
तिला माझ्यासारखे हक्क देशील का?

माझ्यासारखं तिला रागवशील ना
माझ्या पेक्षा तिला शिकवशील का?

मोठा भाऊ मला बनवशील ना
मला पाकिटाचा खर्च देशील का?

तिच्या हट्टाची गाडी ढकलशील ना
थकल्यावर तिलाच बोलावशील का?

आता तरी तिच्यासाठी मला हसवशील ना

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.