विचार फार - मराठी कविता

विचार फार - मराठी कविता - [Vichar Phar, Marathi Kavita] रात्र झाली झोप नाही विचार फार.
विचार फार - मराठी कविता | Vichar Phar - Marathi Kavita

रात्र झाली झोप नाही विचार फार

रात्र झाली
झोप नाही
विचार फार

कुटूंब
मतभेद
विसंब

गैरसमज
रोजा रोज
सहज

खोटं बोलणं
मागे सरणं
कान भरणं

भेटी गाठी
प्रेम
नाती गोती

रक्त
खून
जाळपोळ

राजकारण
गूढ प्रश्न
निवारण

त्रास
सावल्या
भास

एकटेपणा
शोधाशोध
आपलेपणा

सकाळ झाली
झोप नाही
विचार फार

- समर्पण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.